Aquarius Weekly Horoscope 27 Nov-3 Dec 2023: कुंभ राशीला या आठवड्याच्या सुरुवातीला आठवड्याच्या सुरुवातीला (Weekly Horoscope) मुलांकडून सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहील. बौद्धिक कार्याशी संबंधित लोकांना महत्त्वपूर्ण यश मिळेल. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या, घाई टाळा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं. मित्रांसोबत तुम्ही एखाद्या पर्यटनस्थळी जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. व्यावसायिक निर्णयात घाई करू नका. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला अपार आनंदाचा अनुभव घेता येईल.
व्यवसायात घाईत निर्णय घेणं टाळा
व्यावसायिकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला व्यवसायात पूर्वीपेक्षा जास्त कष्ट करावे लागतील. या आठवड्यात व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या, घाई टाळा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं. नवीन उद्योग सुरू करण्याची योजना यशस्वी होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला व्यवसायात काही गुंतवणूक करावी लागेल. खर्च वाढतील.
नोकरीत इच्छित पद मिळेल
नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला नोकरीत इच्छित पद किंवा जबाबदारी मिळेल. त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल.
कुंभ राशीचे या आठवड्यातील कौटुंबिक जीवन
या आठवड्यात तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, ज्याचा परिणाम तुमच्या कामावर दिसून येईल. आठवड्याच्या शेवटी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घरापासून दूर जावं लागेल. जमीन, वास्तू, वाहन इत्यादींच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला लाभ होईल. आठवड्याच्या सुरुवातीला प्रेमसंबंधांमध्ये प्रेम कमी राहील, त्यामुळे नात्यात थंडावा जाणवेल. वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराबद्दल तुम्हाला आकर्षण वाढेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीचे सहकार्य लाभेल, जे एक सुखद अनुभूती देईल. आठवड्याच्या शेवटी समाजात तुम्ही करत असलेल्या चांगल्या कामाबद्दल तुम्हाला आदर मिळेल. मित्रांसोबत तुम्ही पर्यटनस्थळी जाऊ शकता.
कुंभ राशीचं या आठवड्यातील आरोग्य
आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे आरोग्य चांगले राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारेल. कोणत्याही गंभीर आजाराने त्रस्त लोकांना आराम मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुमचे आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. मानसिक आणि शारीरिक ऊर्जा जाणवेल. सर्वसाधारणपणे तुमचे आरोग्य चांगले राहील. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीत चढ-उतार होतील. दारू पिऊन गाडी चालवू नका, अन्यथा तुम्हाला दुखापत होऊ शकते. योगासने आणि प्राणायाम नियमित करत राहा.
कुंभ राशीसाठी उपाय
गुरुवारी केस धुवू नका आणि केळी खाऊ नका. कपाळावर कुंकू किंवा हळदीचा तिलक लावावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :