Aquarius Weekly Horoscope 16 To 22 January 2023 : जानेवारी 2023 (2023) चा तिसरा आठवडा म्हणजे 16 ते 22 जानेवारी हा कुंभ ( Aquarius)राशीच्या लोकांसाठी चांगला काळ असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, त्यामुळे तुमचा आठवडा खूप चांगला जाईल. मात्र, आरोग्याच्या बाबतीत काही समस्या असू शकतात. व्यवसाय आणि नोकरीत लाभ होईल. उत्पन्नाचे नवीन मार्गही मोकळे होतील आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल, परंतु खर्चही वाढू शकतात. या आठवड्यात तुमचे तारे काय म्हणतात? जाणून घ्या. कुंभ साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope)


 


कुंभ साप्ताहिक राशिभविष्य 
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि सौभाग्य देणारा आहे. वाणी आणि समजूतदारपणामुळे तुम्ही मोठे काम करू शकाल. नोकरी व्यवसायाशी संबंधित कुंभ राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला काही मोठे यश किंवा सन्मान मिळू शकतो. अधिकारी आणि बॉस तुमच्या कामाचे कौतुक करतील, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील आणि संचित संपत्तीही वाढेल. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही घरातील सामान किंवा सुविधांसाठी खरेदी करू शकता, ज्यासाठी पैसे खर्च होतील.


 


शेअर मार्केटशी संबंधित
कुंभ राशीचे असे लोक जे शेअर मार्केटशी संबंधित आहेत, त्यांना अचानक मोठा फायदा होऊ शकतो. दुसरीकडे, व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. कामाच्या व्यस्ततेमध्ये तुम्हाला तुमच्या शरीराची विशेष काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या मध्यात आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका आणि त्वरित उपचार करा. तसेच, तुमची दिनचर्या आणि खाण्याच्या सवयींची काळजी घ्या. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.


 


कामाचा ताण वाढू शकतो.
16 जानेवारीपासून सप्ताह सुरू होत आहे. आणि 17 जानेवारी 2023 रोजी शनी तुमच्या राशीत भ्रमण करत आहे. शनीचा हा राशी बदल खूप खास मानला जातो. आणि हे या वर्षातील प्रमुख संक्रमणांपैकी एक आहे. या काळात तुम्हाला काही तणाव जाणवू शकतो. कामाचा ताण वाढू शकतो. पण काही गोष्टींमध्ये फायदा होईल. व्यवसायात प्रगतीचा मार्ग खुला होईल. बाजारात तुमची स्थिती हळूहळू सुधारेल. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. सासरच्या मंडळींशी वाद ठेऊ नका. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. आठवड्याच्या शेवटी म्हणजे 22 जानेवारीला शुक्र तुमच्या राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे सुख-समृद्धी वाढते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Capricorn Weekly Horoscope 16 To 22 January 2023 : मकर राशीच्या लोकांनी घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य