Aquarius Horoscope Today 21 April 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नोकरदार लोकांसाठी नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यास विलंब होऊ शकतो. वैवाहिक जीवन (Married Life) सुखकर राहील. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन जे काही काम कराल ते नक्कीच पूर्ण होईल. मुलांकडून तुमचा आदर वाढेल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना विशेष लाभ मिळणार नाही. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. कुटुंबात सुरू असलेला कलह संपेल. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. नवीन नोकरीची (Job) ऑफर येईल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर काही वेळ एकांतात घालवा. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल.


धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा


आज कुंभ राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल. तुमच्या नात्यातील दुरावा कमी होऊन प्रेम वाढेल. कौटुंबिक वातावरणही चांगले राहील. आज तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या रखडलेल्या कामांमुळे तुम्ही चिंतेत असाल, ज्यासाठी तुम्ही महत्वाच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता. आज, व्यावसायिक कामकाजात अपेक्षित नफा मिळेल. या राशीचे लोक जे लोखंडाशी संबंधित काम करतात त्यांचा व्यवसाय देखील सामान्य गतीने होताना दिसेल. नोकरी व्यवसाय वर्गातील कर्मचारी स्वतःच्या कामात मग्न राहतील.


ज कुंभ राशीचे तुमचे आरोग्य


आज कुंभ राशीचे आरोग्य पाहता रक्तदाबाच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमित औषधांकडे दुर्लक्ष करू नका.


कुंभ राशीसाठी आजचे उपाय 


कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी पिंपळाच्या झाडाखाली लोखंडी भांड्यात पाणी, साखर, दूध, तूप मिसळून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवा. आणि 21 शुक्रवारपर्यंत हे व्रत करत राहा.


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Horoscope Today 21 April 2023 : मेष, धनु, मीन राशीच्या लोकांना सतर्कतेचा इशारा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य