Aquarius Horoscope Today 1st April 2023 कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते तुम्ही परत करा. अनेक दिवसांपासून थांबलेली घरातील कामे आज जोडीदाराबरोबर पूर्ण करा. तुमचे प्रेम जीवन चांगले राहील, परंतु दुसर्‍या व्यक्तीचा हस्तक्षेप तुमच्या नात्यात दुरावा आणू शकतो, सावधगिरी बाळगा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगला आहे. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा.

  


आंधळेपणाने विश्वास ठेवू नका


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. आज तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद होईल, परंतु तरीही, तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमचा विश्वासघात होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम असण्याचा योग आहे. आज या राशीचे नोकरदार लोक ऑफिसमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण करतील.


वैवाहिक नात्यात गोडवा येईल


आज तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि दोघेही एकमेकांची काळजी घ्या. आज तुम्हाला भाऊ-बहिणींकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. आज नातेवाईकांशी वाद घालू नका, अन्यथा संबंध बिघडण्याचा धोका आहे. आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कठीण जाईल. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठेपेक्षा कामाकडे जास्त लक्ष द्या. 


आज कुंभ राशीचे आरोग्य 


कुंभ राशीच्या लोकांना इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतंही काम करताना घाई करु नका. तसेच वाहन चालवताना काळजी घ्या. 


कुंभ राशीसाठी आजचे उपाय 


नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी पिंपळाच्या झाडाखाली लोखंडी भांड्यात पाणी, साखर, दूध, तूप मिसळून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवा. 21 मंगळवारपर्यंत हे व्रत करत राहा.


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 1st April 2023 : महिन्यातला पहिला शनिवार 'या' राशींसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य