Aquarius Horoscope Today 11 May 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल करू शकता, तुम्ही मॉर्निंग वॉक, योग, ध्यान यांचा समावेश करू शकता. मालमत्तेतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र कुठेतरी जाण्याचा बेत आखतील. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. घर, फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश येईल. आरोग्याबाबत जागरुक राहा. व्यवसायातून उत्पन्न वाढेल. भावा बहिणीचे सहकार्य मिळेल. बॅचलर्सचे नाते पुढे जाऊ शकते. राजकारणात चांगली संधी आहे. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल.


राजकारणात यश मिळणार 


आजचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. तुमच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जे समाजाच्या सेवेसाठी काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. विद्यार्थी परीक्षेची तयारी मनापासून करतील यामध्ये त्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल.


कुटुंबातील पती-पत्नीच्या नात्यात गोडवा दिसून येईल. भावा-बहिणींच्या उच्च शिक्षणासाठी पैसे गुंतवण्याचा निर्णय घ्याल. आज तुम्ही कुटुंबाच्या भल्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घ्याल, कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा. सक्रिय सहभाग घ्या. ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.


आजचे कुंभ राशीचे आरोग्य
कुंभ राशीचे लोक खांद्यामध्ये दुखण्याची तक्रार करू शकतात. कोणताही भार वगैरे उचलू नका. सकाळी श्वासोच्छवासावर आधारित योगाभ्यास करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.


कुंभ राशीसाठी आजचे उपाय 
नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा.


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 11 May 2023 : मेष, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' चुका करू नयेत; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य