April 2026 Monthly Horoscope: आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून एप्रिल महिना सुरु होतोय. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 वर्षाचा हा चौथा महिना अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारा ठरणार आहे. तसेच, या कालावधीत अनेक मोठ्या ग्रहांचं नक्षत्र तसेच राशी परिवर्तन होणार आहे. ग्रहस्थितीनुसार, हा महिना करिअर, पैसा, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये काय परिणाम देऊ शकतो? एप्रिल 2026 चा (March 2026) महिना मेष ते कन्या राशींसाठी नेमका कसा असणार आहे? यासाठी मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात.

मेष मासिक राशीभविष्य (Aries April 2026 Monthly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा महिना प्रगतीचा ठरेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य सामान्य राहील, मात्र थकवा जाणवू शकतो. मंगळवारी हनुमान चालीसा वाचा.

वृषभ मासिक राशीभविष्य (Taurus April 2026 Monthly Horoscope)

वृषभ राशीसाठी एप्रिलचा महिना स्थिरता आणि आर्थिक सुधारणा घेऊन येईल. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती दिसेल. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांचा पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. आरोग्य चांगले राहील, पण आहारावर लक्ष द्या. शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा.

मिथुन मासिक राशीभविष्य (Gemini April 2026 Monthly Horoscope)

मिथुन राशीसाठी एप्रिलचा महिना नवीन संधी घेऊन येईल. करिअरमध्ये बदल किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल, पण अचानक खर्च वाढू शकतो. मानसिक ताण टाळण्यासाठी योग-ध्यान करा. बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा

कर्क मासिक राशीभविष्य (Cancer April 2026 Monthly Horoscope)

कर्क राशीसाठी एप्रिलचा महिना थोडा सावध राहण्याचा इशारा देत आहे. कामात मेहनत जास्त घ्यावी लागेल. कुटुंबात काही छोटे वाद होऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा. आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा.

सिंह मासिक राशीभविष्य (Leo April 2026 Monthly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा महिना यश आणि मान-सन्मान देणारा ठरेल. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकते. व्यवसायात फायदा होईल. प्रेमसंबंध मजबूत होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्य चांगले राहील. रविवारी सूर्याला अर्घ्य द्या.

कन्या मासिक राशीभविष्य (Virgo April 2026 Monthly Horoscope)

कन्या राशीसाठी एप्रिलचा महिना मेहनतीचा ठरणार आहे. कामाचा ताण वाढू शकतो, पण त्याचे चांगले फळ मिळेल. नोकरीत प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. बुधवारी विष्णू पूजन करा.

हेही वाचा

April 2026 Monthly Horoscope: काऊंटडाऊन सुरू! एप्रिल महिना 12 राशींसाठी कसा जाणार? ग्रहांचे शुभ योगायोग, कोण मालामाल? कोणाला टेन्शन? मासिक राशीभविष्य...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)