April 2026 Monthly Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मार्चनंतर एप्रिल महिना सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. 2026 वर्षाचा हा चौथा महिना आहे. तसेच, या कालावधीत अनेक मोठ मोठ्या ग्रहांचं नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे एप्रिल 2026 चा (March 2026) महिना मेष ते कन्या राशींसाठी नेमका कसा असणार आहे? यासाठी मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात.
मेष मासिक राशीभविष्य (Aries April 2026 Monthly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा महिना चांगला असणार आहे. या महिन्यात करिअरमध्ये प्रगती, नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंध मजबूत होतील.
वृषभ मासिक राशीभविष्य (Taurus April 2026 Monthly Horoscope)
वृषभ राशीसाठी एप्रिलचा महिना प्रगतीचा असणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात स्थिरता मिळेल. आर्थिक नियोजन करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या.
मिथुन मासिक राशीभविष्य (Gemini April 2026 Monthly Horoscope)
मिथुन राशीसाठी एप्रिलचा महिना यशाचा असणार आहे. नवीन कल्पना आणि संपर्क वाढतील. कामात यश मिळेल. प्रवासाचे योग आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.
कर्क मासिक राशीभविष्य (Cancer April 2026 Monthly Horoscope)
कर्क राशीसाठी एप्रिलचा महिना संमिश्र असणार आहे. भावनिक निर्णय टाळा. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. नोकरीत बदल किंवा प्रमोशनची शक्यता. आरोग्य चांगले राहील.
सिंह मासिक राशीभविष्य (Leo April 2026 Monthly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा महिना नव्या संधींचा असणार आहे. या काळात तुमचे नेतृत्व गुण वाढतील. करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. आर्थिक लाभ होईल. प्रेमसंबंधात आनंद मिळेल.
कन्या मासिक राशीभविष्य (Virgo April 2026 Monthly Horoscope)
कन्या राशीसाठी एप्रिलचा महिना सावधानतेचा असणार आहे. या काळात कामात थोडा ताण राहू शकतो. संयम ठेवणे आवश्यक. पैशांची बचत करा. आरोग्याकडे लक्ष द्या.
हेही वाचा>>
Shukra Transit 2026: मार्च जाता जाता 5 राशींच्या आयुष्याचं सोनं करणार! 26 मार्चला शुक्राचे डबल संक्रमण, कुबेराचा खजिना खुला, श्रीमंतीचे योग..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
