Angry Zodiac Signs: बरेच लोक शांत स्वभावाचे (Calm Nature) असतात, जे कितीही प्रतिकूल आणि कठीण प्रसंग आले तरी ते कधीच रागवत नाहीत. तर दुसरीकडे काही लोक असे असतात, ज्यांना प्रत्येक गोष्टीत राग (Angry Nature) येतो. खरं तर, ही राशीचक्र चिन्हं आहेत, जी एखाद्याला शांत मनुष्य बनवतात तर कुणाला रागीट बनवतात. असे काही लोक आहेत, जे आपला राग व्यक्त करतात, तर काही लोक आतमध्येच आपला राग दाबून ठेवतात. विशिष्ट राशीच्या (Zodiac Signs) लोकांना राग कसा येतो? ज्योतिषशास्त्राद्वारे या मागील कारण जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
जसा एडका स्वभावाने खूप सरळ असतो, त्याचप्रमाणे या राशीचे लोकही असतात. एडक्याचा मेष राशीच्या लोकांच्या स्वभावावर खूप प्रभाव आहे, कारण त्यांच्या राशीचे चिन्ह एडका आहे. सामान्यतः ते वरुन शांत स्वभावाचे मानले जातात. पण त्यांच्या मनात राग असेल तर ते सरळ तोंडावर बोलून मोकळे होतात. मेष राशीचे लोक मनात जास्त गोष्टी ठेवत नाहीत.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीचे प्रतीक बैल आहे आणि या राशीचे लोक बैलासारखेच मेहनती असतात. त्यांना खूप उशिरा राग येतो, पण जेव्हा त्यांना राग येतो, तेव्हा तो खूपच जास्त असतो. वृषभ राशीच्या लोकांना एकदा राग आला की, त्यांना शांत करणं खूप अवघड असतं. राग आल्यावर वृषभ राशीचे लोक स्वतःच शांत होतात. वृषभ राशीचे लोक सहसा शांतच असतात, पण राग आला की ते फार तापट होतात.
मिथुन रास (Gemini)
प्रत्येक मुद्द्यावर उत्तेजित होणं आणि रागावणं ही मिथुन राशीच्या लोकांची खासियत आहे. या लोकांना जसा लहानसहान गोष्टींवर राग येतो, तसंच छोट्या छोट्या गोष्टींमधून या लोकांना आनंदही होतो. या लोकांचा स्वभाव असाच असतो. मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या अगदी जवळच्या लोकांवरही अगदी पटकन राग येतो. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीसमोर ते आपला राग दाबून टाकतील, मात्र ओळखीच्या व्यक्तीसमोर ते आपला राग व्यक्त केल्याशिवाय गप्प बसत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :