Angaraki Chaturthi 2026: आज अंगारकी चतुर्थी...भगवान गणेशाला समर्पित हा दिवस आहे, वैदिक पंचांगानुसार, 5 मे 2026 रोजी येणारी अंगारकी चतुर्थी ही अत्यंत पुण्यदायी आणि प्रभावशाली तिथी मानली जाते. मंगळवार (अंगारक) आणि चतुर्थी एकत्र आल्यामुळे भगवान गणेश आणि मंगळ ग्रह या दोघांचीही विशेष ऊर्जा या दिवशी सक्रिय असते. त्यामुळे जीवनातील अडथळे दूर करणे, नवीन सुरुवात करणे, कर्जमुक्ती आणि यशप्राप्तीसाठी हा दिवस खूप शुभ ठरतो. या दिवशी काही राशींवर विशेष भाग्याची साथ दिसून येते. जाणून घेऊया आजच्या भाग्यशाली दिवसाबद्दल...
आज अंगारकी चतुर्थीला शिवयोगाचा शुभ योग (Angaraki Chaturthi 2026)
ज्योतिषशास्त्रानुसार, आज अंगारकी चतुर्थी मंगळवार, 5 मे 2026 रोजी आहे आणि शिवयोगाचा शुभ योग तयार होत आहे. यामुळे काही राशींना शुभ फळे मिळतील. आज चंद्र धनु राशीत प्रवेश करेल. तसेच, आज, मंगळवार, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी आहे, जी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आज देखील शिवयोगाचा योग तयार होत आहे. काही राशींना गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे आर्थिक लाभ आणि प्रगती होईल.
शुभ मुहूर्त
अंगारकी चतुर्थी सुरूवात - 5 मे रोजी मंगळवार सकाळी 5.24 वाजताबुधवार, 6 मे रोजी सकाळी 7.51 वाजता ही तिथी संपणार आहे. त्यामुळे उदयतिथीनुसार अंगारकी चतुर्थी 5 मे रोजी असणार आहे.
चंद्रोदयाची वेळ (Moon Rise)
अंगारकी चतुर्थीचा उपवास 5 मे रोजी केला जाईल आणि चंद्रोदयाची वेळ रात्री 10.31 वाजता आहे.
मेष (Aries)
ज्योतिषशास्त्रानुसार, आज अंगारकी चतुर्थीला तुमच्यात प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वास दिसेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात, विशेषतः जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या अचानक लाभ होऊ शकतो. वैयक्तिक आयुष्यातही तुमचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या मताला महत्त्व देतील.
वृषभ (Taurus)
ज्योतिषशास्त्रानुसार, आज अंगारकी चतुर्थीचा हा दिवस तुमच्यासाठी स्थिरता आणि प्रगती घेऊन येईल. आर्थिक व्यवहारांमध्ये यश मिळेल आणि गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील एखादी चांगली बातमी तुमचा उत्साह वाढवेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन क्लायंट किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो.
कर्क (Cancer)
ज्योतिषशास्त्रानुसार, आज अंगारकी चतुर्थीचा हा दिवस तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारा हा दिवस ठरू शकतो. मानसिक शांतता मिळेल आणि ताण कमी होईल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घर, जमीन किंवा वाहनाशी संबंधित निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधातही गोडवा वाढेल.
सिंह (Leo)
ज्योतिषशास्त्रानुसार, आज अंगारकी चतुर्थीचा हा दिवस तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे दरवाजे उघडू शकतात. तुमचे नेतृत्व आणि निर्णयक्षमता यांची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल किंवा जबाबदारी वाढू शकते. आर्थिकदृष्ट्या मजबूत स्थिती राहील. समाजात मान-सन्मान वाढेल आणि तुमचा प्रभाव अधिक ठळक होईल.
धनु (Sagittarius)
ज्योतिषशास्त्रानुसार, आज अंगारकी चतुर्थीचा हा दिवस भाग्य तुमच्या बाजूने असल्यामुळे अनेक गोष्टी सहज पूर्ण होतील. शिक्षण, परदेश प्रवास किंवा नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळू शकते. आध्यात्मिकतेकडे झुकाव वाढेल आणि मन प्रसन्न राहील. आर्थिकदृष्ट्या देखील सुधारणा दिसेल. जुने प्रश्न सोडवले जातील आणि नवीन दिशा मिळेल.
हेही वाचा
