Angarak Chaturthi 2026: अंगारक चतुर्थी.. भगवान गणेशाला समर्पित हा हिंदू सण. हिंदू दिनदर्शिकनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला हा दिवस साजरा केला जातो. गणेश उपासनेत चतुर्थी तिथीला खूप महत्व आहे आणि हीच चतुर्थीजरमंगळवारीआलीतर तिला अनन्य साधारण असे महत्व येते. नुकतंच2026 वर्षाला सुरूवात झाली आहे. आणि नववर्षातली पहिली अंगारक चतुर्थी 6 की 7 जानेवारीला येणार? याबाबत अनेकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा 4 राशी अशा आहेत, ज्यांचे भाग्यही फळफळणार आहे. जाणून घ्या चंद्रोदय वेळ, मुहूर्त, महत्त्व
संकट निवारण, कर्जमुक्ती, आरोग्यलाभ...
धार्मिक मान्यतेनुसार मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारक चतुर्थी असे म्हटले जाते. मंगल ग्रहाशी संबंधित त्या दिवशी केलेली श्री गणेशाची पूजा संकट निवारण, कर्जमुक्ती, आरोग्यलाभत्याचबरोबरकार्यसिद्धीस हितकारक असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. या दिवशी भक्त श्री गणेशासाठी व्रत (उपवास) करतात. हा दिवस अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणूनही प्रसिद्धआहे. गणेशभक्तांकडून हा उपवास विशेष श्रद्धेने पाळला जातो. गणेश मंदिरांमध्ये या दिवशी विशेष पूजा-अर्चा केली जाते.
2026 मध्ये कधी येणार अंगारक चतुर्थीचा योग..
हिंदू दिनदर्शिकेनुसार, साधारणपणे सहा महिन्यातून एकदा चतुर्थी येते पण 2026 वर्षात ग्रह-नक्षत्रांच्या विशेष स्थितीमुळे तीन वेळा हा योग येत आहे. यावर्षी6जानेवारी, 5मे आणि 29सप्टेंबरह्यातीनदिवशीअंगारकी चतुर्थी येणार आहे.
अंगारक संकष्टी 6 की 7 जानेवारी?
पंचांगानुसार, पौष कृष्ण चतुर्थी तिथी 6 जानेवारी 2026, मंगळवारी सकाळी 08:01 वाजता सुरू होईल आणि 7 जानेवारी रोजी सकाळी 06:52 वाजता समाप्त होईल. संकष्टी चतुर्थीच्या व्रतात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असणे आवश्यक असते. 7 जानेवारी रोजी चंद्रोदयाच्या वेळी पंचमी तिथी असेल, तर 6 जानेवारी रोजी चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असेल. त्यामुळे पौष महिन्यातील अंगारकीसंकष्टीचे व्रत आणि पूजन 6 जानेवारी रोजीच केले जाईल.
चंद्रोदयाची वेळ
पंचांगानुसार,6 जानेवारी रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री 08:54 असेल. या वेळी चंद्राची पूजा आणि पाणी अर्पण करून अर्घ्य द्यावे. त्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी 7 जानेवारी रोजी सूर्योदयानंतर व्रताचे पारण करावे.
6 जानेवारीला4 राशींचं भाग्य फळफळणार...
ज्योतिषशास्त्रानुसार, 6 जानेवारीचा दिवस अत्यंत खास आहे.या वर्षातील पहिला शुक्रादित्य योग या दिवशी तयार होईल, जो चार राशींना संपत्ती, प्रतिष्ठा आणि आकर्षण देईल. या वर्षाच्या सुरुवातीला कोणत्या चार राशींचं भाग्य उजळेल ते जाणून घेऊया, कारण सूर्याची शक्तीआणिशुक्राचीसंपत्ती यांचे हे संयोजन त्यांना समृद्धी आणि प्रगती देईल.
मेष (Aries)
ज्योतिषशास्त्रानुसार, 6जानेवारीपासून तयार होणाऱ्याशुक्रादित्य योगामुळे मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक आणि सामाजिक ताकदीचा अनुभव येईल. कामात यश आणि कीर्ती वाढेल. नवीन संपर्क आणि मैत्रीतुमच्यासाठीफायदेशीरठरेल. प्रेमआणि कौटुंबिक जीवनातही आनंद आणि समाधान मिळेल. जे लोक दीर्घकाळापासून गुंतवणूक किंवा व्यवसायाच्या संधी शोधत आहेत त्यांना या काळात लाभ मिळू शकतात. या काळात मानसिक ताण कमी होईल आणि सकारात्मक विचारसरणीमुळे सर्व कामे सोपी होतील.
मिथुन (Gemini)
ज्योतिषशास्त्रानुसार,मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी, नातेसंबंध आणि करिअरमध्येशुक्रादित्य योग फायदेशीर ठरेल. प्रियजन आणि सहकाऱ्यांकडूनसहकार्यमिळेल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल आणि नफ्याच्या अनपेक्षित संधी निर्माण होऊ शकतात. कला, सर्जनशीलता किंवा मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्यांना या काळात विशेष यश मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल, तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक दिसेल. याकाळातविशेषफायदा होऊ शकतो.
सिंह (Leo)
ज्योतिषशास्त्रानुसार,सिंह राशीच्या लोकांसाठी, हा योग आदर आणि करिअरच्या प्रगतीसाठी विशेषतः शुभ राहील. लोक तुमच्या नेतृत्वाची आणि आत्मविश्वासाची प्रशंसा करतील. जुने संघर्ष आणि अडचणी मागे राहू शकतात आणि नवीन यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि गुंतवणूक किंवा व्यवसायात नफ्याच्या संधीनिर्माणहोतील. कुटुंब आणि प्रेम संबंधांमध्येही संतुलन आणि आनंद राहील. तुमचे निर्णय आणि विचार इतरांसाठी प्रेरणा बनतील.
तूळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार,तुळ राशीच्या लोकांसाठी, हा योग आर्थिक आणि कामाच्या क्षेत्रात विशेषतः शुभ राहील. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला आदर देतील. तुमचे मनोबल देखील वाढेल, ज्यामुळे तुमच्यावर विश्वास वाढेल. आरोग्यसामान्यतःचांगलेराहील, परंतु व्यस्त वेळापत्रकामुळेस्वतःसाठी वेळ काढण्यास विसरू नका. नवीन योजना किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळखूपअनुकूलअसेल.
हेही वाचा
Ashtadash Yog 2026: नववर्ष... मोठं यश...संपत्तीत वाढ...4 जानेवारीपासूनच 3 राशींच्या नशीबाचे फासे पालटले! मंगळ-यम ग्रहांचा पॉवरफुल अष्टदश योग
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
