Continues below advertisement

Angarak Chaturthi 2026: 2026 नवीन वर्ष सुरू झालंय. 2025 वर्षात अनेकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर 2026 हे वर्ष अनेकांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. येणारा प्रत्येक दिवस तसा खास असतो, हा दिवस येताना नव्या आशा, उमेद आणि अनेकांचं नशीब घेऊन येतो. ज्योतिषींच्या मते, अशाच प्रकारे 6 जानेवारीचा दिवस हा अत्यंत खास आहे. कारण या दिवशी अंगारकी चतुर्थी येतेय. सोबत ग्रहांचे दुर्मिळ योग देखील बनत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, 6 जानेवारीचा दिवस 3 राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन येतोय, अंगारकी चतुर्थीपासून दिवशी कोणत्या राशी भाग्यशाली ठरतील? बाप्पाच्या कृपेने कोणाचा सुवर्णकाळ सुरू होणार

6 जानेवारीपासून 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू..(Angarak Chaturthi 2026)

वैदिक पंचांगानुसार, 2026 मध्ये, भगवान गणेशाला समर्पित अंगारकी चतुर्थी 6 जानेवारी रोजी ये आहे. हा दिवस केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच विशेष नाही तर ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. पंचांगानुसार, 6 जानेवारी 2026 रोजी, सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे 'युती दृष्टी योग' निर्माण होईल, ज्योतिषशास्त्रात, युती दृष्टी योगाची निर्मिती अत्यंत शुभ मानली जाते आणि त्याचा सकारात्मक परिणाम शकट चौथपासून अनेक राशींच्या जीवनावर होत आहे. अंगारकी चतुर्थीपासून कोणत्या तीन राशींना चांगले दिवस येणार आहेत ते जाणून घेऊया.

Continues below advertisement

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, युती दृष्टी योगाची निर्मिती वृषभ राशीसाठी चांगली राहील. अंगारकी चतुर्थीपासून तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. शिवाय, तुम्हाला आर्थिक अडचणींपासून आराम मिळेल. आरोग्याबाबत, तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्हाला सुधारणा दिसेल. परीक्षेची तयारी करणारे 2026 मध्ये त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आणि चांगले गुण मिळवतील.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान गणेशाच्या आशीर्वादाने अंगारकी चतुर्थीच्या शुभ दिवशी तूळ राशीच्या लोकांना कामात यश मिळू शकते. नोकरी करणारे पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने काम करतील आणि महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करतील. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना या चतुर्थीच्या दिवशी जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. 2025 मागच्या वर्षातील तुमचे नुकसान लवकरच भरून काढाल.

मीन (Pisces)

ज्योतिषशास्त्रानुसार, अंगारकी चतुर्थीच्या शुभ दिवशी युती दृष्टी योगाची निर्मिती मीन राशींसाठी अनुकूल असेल. मित्रांच्या सहकार्याने, नोकरी करणारे व्यक्ती नवीन ठिकाणी गुंतवणूक करू शकतात. त्यांना पैसे कमविण्याच्या उत्तम संधी देखील मिळतील. वैवाहिक जीवनाबद्दल, तुम्हाला कोणतीही चिंता राहणार नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासह आणि मुलांसह सहलींचे नियोजन कराल. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं तर, तुमचे आरोग्य चांगले राहील.

हेही वाचा

Tripushkar Yog 2026: चिंता मिटली! आज 5 जानेवारीपासून 3 राशींचा संपत्तीचा मार्ग मोकळा! ग्रहांचा पॉवरफुल त्रिपुष्कर योग, तिप्पट वेगाने प्रगती, श्रीमंतीचे योग...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)