Anant Ambani Radhika Merchant Wedding Card : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असणारे मुकेश अंबानी (Muklesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाची तारीख अखेर ठरली आहे. 12 जुलैला अनंत आणि राधिका हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. या शाही विवाह सोहळ्याची सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहात होते. अखेर लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. नुकताच त्यांच्या वेडिंग कार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या वेडिंग कार्डवर लग्न सोहळ्याचे सगळे विधी आणि कार्यक्रम देण्यात आले आहेत. पण, त्याबरोबर या वेडिंग कार्डवर देण्यात आलेला श्लोक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. त्यामुळे या श्लोकाचा अर्थ नेमका काय ते जाणून घेऊयात.
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाड्गम्
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्
हा एक फार सुंदर आणि अर्थपूर्ण असा श्लोक आहे. जो भगवान श्रीहरी विष्णू यांच्यावर लिहीण्यात आला आहे. ब्रम्ह, विष्णू आणि महेश या त्रिदेवांपैकी एक असलेले श्री विष्णू आहेत. भगवान श्री विष्णू यांना सृष्टीचे निर्माते मानले जाते. हा श्लोक सृष्टीच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी रचण्यात आला आहे.
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
आकाराने शांत, भुजंग(साप) वर झोपलेला, नाभीवर कमळ असलेला असा सुरेश्वर (सूर = देव + देव), देवांचाही देव
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाड्गम्
जगाचा आधार, आकाशाप्रमाणे विशाल, ढगांसारखे रंग असलेले ज्याचे शरीर शुभ आहे.
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिध्यानगम्यम्
लक्ष्मीचे डोळे, कमळासारखे डोळे, योगियांसारखे ध्यान करणारे
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्
सर्व भय दूर करणारा, सर्व जगाचा स्वामी विष्णूला नमस्कार असो
या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा होतो की, हे सर्व देवतांच्या स्वामी, ज्याच्या नाभीत कमळ आहे. ज्यांचं स्वरूप शांत आहे, जे नागावर झोपतात जे या जगाचा आधार आहेत. आकाशासारखं विशाल, ढगांसारखा ज्यांचा रंग आहे. लक्ष्मीचा पती आहे. कमळासारखे डोळे आहेत. ध्यानस्थ आहेत. योगी, सर्व जगाचा स्वामी, सर्व सांसारिक भयांचा नाश करणारा विष्णू आम्ही तुझी पूजा करतो. तुला वंदन करतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: