Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय; घरात होईल धनसंपत्तीत भरभराट, देवी लक्ष्मीचीही कृपा
Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर राशीनुसार काही विशेष उपाय केल्यास सुख-समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, असे मानले जाते.

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) शुभ मुहूर्तावर राशीनुसार काही विशेष उपाय केल्यास सुख-समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, असे मानले जाते. या दिवशी दान आणि गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी असल्यामुळे या दिवशी जे कराल ते जीवनभर सोबत राहील. याच संदर्भात अधिक माहिती डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी दिली आहे ती जाणून घेऊयात.
अक्षय्य तृतीयेला राशीनुसार उपाय
मेष रास (Aries Horoscope)
उपाय : या दिवशी मसूर डाळ दान करावी.
खरेदी : सोने किंवा तांब्याच्या वस्तू खरेदी करणे शुभ ठरेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
उपाय : लक्ष्मी देवीला पांढरे फुलं अर्पण करा आणि तांदूळ किंवा साखरेचे दान करा.
खरेदी : चांदीचे नाणे किंवा दागिन्यांची खरेदी करावी.
मिथुन रास (Gemini Horoscope)
उपाय : हिरवे मूग किंवा हिरवे कापड गरिबांना दान करा.
खरेदी : सोने किंवा नवीन कोरे कपडे खरेदी करणे लाभदायक ठरेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
उपाय : पांढऱ्या वस्तूं दान करा, जसे की दूध, दही किंवा तांदूळ. शिवलिंगावर अभिषेक करणे उत्तम.
खरेदी : चांदीच्या वस्तू किंवा श्रीयंत्र खरेदी करा.
सिंह रास (Leo Horoscope)
उपाय : गुळ किंवा गहू दान करा. उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या.
खरेदी : सोने किंवा पितळेच्या वस्तू खरेदी करा.
कन्या रास (Virgo Horoscope)
उपाय : हिरव्या पालेभाज्या किंवा पशुंना चारा खाऊ घाला. गणपतीला दुर्वा अर्पण करा.
खरेदी : गुंतवणुकीसाठी जमीन किंवा मालमत्तेचे व्यवहार करणे शुभ आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
उपाय : पांढरे सुती कपडे दान करा. लक्ष्मी अष्टकाचे पठण करा.
खरेदी : अत्तर, सौंदर्य प्रसाधने किंवा चांदीची खरेदी करा.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
उपाय : गुळ आणि हरभरा डाळ दान करावी. हनुमानाची उपासना करा.
खरेदी : तांब्याची भांडी किंवा सोने खरेदी करा.
धनु रास (Saggitarius Horoscope)
उपाय : पिवळ्या वस्तू दान करा (केळी, हळद किंवा पिवळे कापड).
खरेदी : धार्मिक पुस्तके किंवा सोन्याचे दागिने खरेदी करा.
मकर रास (Capricorn Horoscope)
उपाय : काळे तीळ किंवा छत्री दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
खरेदी : वाहन किंवा लोखंडी वस्तूंची खरेदी करू शकता.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
उपाय : पिण्याच्या पाण्याचे दान करा (जसे की रांजण किंवा थंड पाणी). गरिबांना अन्नदान करा.
खरेदी : सोन्याचे नाणे किंवा नवीन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करा.
मीन रास (Pisces Horoscope)
उपाय : केशरयुक्त दुधाचा नैवेद्य लक्ष्मीला दाखवा आणि चणा डाळ दान करा.
खरेदी : सोन्याच्या वस्तू किंवा घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी करा.
सर्व सामान्य उपाय
अक्षय्य तृतीयेला 'मातीचा माठ' किंवा 'पाण्याचे दान' करणे हे सर्वोत्तम मानले जाते. तसेच या दिवशी घरात सकारात्मकता राहावी म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावणे आणि सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावणे विसरू नका.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी एप्रिलचा नवा आठवडा कसा असणार? 2 राशींना लागणार लॉटरी; साप्ताहिक राशीभविष्य



















