Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करणं शक्य नाही? 'या' 5 वस्तूही खरेदी करा, देवी लक्ष्मीची राहील कृपा
Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही स्वस्त तसेच रोजच्या वापरातील वस्तू खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं.

Akshaya Tritiya 2026 : द्रिक पंचांगानुसार, यंदा 19 एप्रिल 2026 रोजी रविवारच्या दिवशी अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीयेचा दिवस मानला जातो. हा फार महत्त्वाचा दिवस आहे. मान्यतेनुसार, या दिवशी तुम्ही जे काही काही कार्य हाती घ्याल त्याचं पुण्य फळ कधीच संपत नाही. उलट दुप्पट पटीने वाढतं. याच कारणामुळे या दिवशी लोक सोनं खरेदी करतात. मात्र, प्रत्येकालाच या दिवशी सोनं खरेदी करणं शक्य होत नाही. अशा वेळी जास्त खर्च न करताही तुम्ही या दिवसाला खास बनवू शकता.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही स्वस्त तसेच रोजच्या वापरातील वस्तू खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणत्या वस्तूंची खरेदी करु शकता हे जाणून घेऊयात.
मातीच्या वस्तू खरेदी करा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मातीचं मडकं, दिवा किंवा मातीची कुंडी या वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील शांती टिकून राहते.
तांब्याची भांडी घ्या
तांबा हा सुद्धा शुभ धातू मानला जातो. या दिवशी तांब्याचं एखादं भांडं खरेदी करणं घरासाठी शुभकारक असतं.
हळद आणि तांदूळ खरेदी करा
हळद आणि तांदूळ या वस्तू पूजेच्या साहित्यासाठी वापरल्या जातात. यांना शुभ्रतेचं प्रतीक मानलं जातं.
धणे खरेदी करा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही धणे खरेदी करु शकता. यामुळे धनसंपत्तीत भरभराट होते.
लाल कापड किंवा कापूस
लाल कापड किंवा कापूस पूजेसाठी वापरता येतो. त्यामुळे या दिवशी या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जाईल.
दान करा
जर तुम्ही अक्षय्य तृतीयेला काहीच खरेदी केलं नसेल तर अशा वेळी तुम्ही गरजूंना सुद्धा दान करा. यामुळे मनाला शांती मिळते. तसेच, सकारात्मक वातावरण राहते.
सोने-चांदी खरेदीचा शुभ मुहूर्त
सकाळी - सकाळी 10.49 ते दुपारी 12.21
दुपारी - दुपारी 1.58 ते दुपारी 3.35
संध्याकाळी - संध्याकाळी 6.50 ते रात्री 10.58
रात्री - दुपारी 1.43 ते संध्याकाळी 3.06
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Chaturgrahi Yog 2026 : आज 48 तासांसाठी जुळून येतोय चतुर्ग्रही राजयोग; मेष, मिथुनसह 'या' राशींवर असणार लक्ष्मी-कुबेराची कृपा, धनसंपत्तीत भरभराट



















