Akshaya Tritiya 2025 Wishes : हिंदू धर्मानुसार, अक्षय्य तृतीयेचा दिवस हा फार महत्त्वाचा दिवस मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त आहे. या दिवशी एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. मित्र-मैत्रीण, नातेवाईकांना शुभेच्छा देतात आणि नवी वस्तूंची खरेदी करतात. तुम्हाला सुद्धा यंदाचा अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) दिवस तुमच्या मित्रपरिवाराबरोबर साजरा करायचा असेल तर त्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छा संदेश तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही सणाचा आनंद द्विगुणित करु शकता. 

अक्षय्य तृतीया शुभेच्छा संदेश 2025 : 

अक्षय्य सुखाचा दिलासा मनात कर्तृत्वाचा भरवसा लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

सोन्याचा रथ, चांदीची पालखी ज्यात बसून घरी येवो लक्ष्मी देवी अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक काम होवो पूर्ण...न काही राहो अपूर्ण...धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन...घरात होवो लक्ष्मीचं आगमन...अक्षय्य तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा!

आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद सुख, समाधान घेऊन येवो...अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आनंदाचे तोरण लागो दारी सुंदर रांगोळी अवतरे अंगणी सुखासमाधानाचा असो आजचा दिवस हीच सदिच्छा.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

सोन्याच्या झळाळीप्रमाणे उजळून जावो आयुष्य तुमचेसुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी हेच मागणे ईश्वराकडे आमचे...अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

या अक्षय्य तृतीयेला तुम्हाला मिळो प्रत्येक आनंदजी इच्छा असेल ती होवो पूर्ण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

अक्षय्य राहो सुख आपलेअक्षय्य राहो नाते आपले अक्षय्य राहो प्रेम आपले  आपणांस आणि आपल्या परिवारास अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया या सणाच्या निमित्ताने सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच प्रार्थना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !

अक्षय्य राहो धनसंपदा, अक्षय्य राहो शांती.. अक्षय्य राहो मनामनातील,प्रेमळ निर्मळ नाती... अक्षय्य तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा!

आपल्या जीवनात नवचैतन्य येवोयेणारे दिवस आपल्या जीवनात आनंद, सुख,समाधान घेऊन येवो अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा...!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Lucky Zodiac Sign : 30 एप्रिल अक्षय्य तृतीयेचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार लकी; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले, घरात लक्ष्मी नांदणार