Akshaya Tritiya 2025 Shubh Yog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचं (Akshaya Tritiya)फार महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते. मात्र, यंदा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुभ संयोग देखील जुळून आले आहेत.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तब्बल 24 वर्षांनी अक्षय योग निर्माण होणार आहे. याआधी हा योग 2001 मध्ये आला होता. यंदा चंद्र आपल्या उच्च राशीत म्हणजेच वृषभ राशीत आहे. यामुळे गजकेसरी योगदेखील जुळून आला आहे. या दिवशी कोणत्या राशी लकी आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस फार खास असणार आहे. या दिवशी तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या पगारात चांगली वाढ पाहायला मिळेल. तसेच, हा काळ तुमच्यासाठी फार शुभ असणार आहे. आर्थिक समस्यांपासून तुमची सुटका होईल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस फार खास असणार आहे. या काळात तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात. तसेच, तुमचे पैसे जर कुठे गुंतले असतील तर त्यातून तुमची सुटका होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. इतकंच नव्हे तर तुमचं मनही फार प्रसन्न राहील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी देखील तुम्हाला मिळू शकते.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस फार आनंदाचा असणार आहे. या काळात तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येईल. मित्रांचं चांगलं सहकार्य लाभेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. पैशांच्या संबंधित तुमचे प्रश्न लवकरच सुटू शकतात. तुमच्या व्यवसायात चांगली बरकत पाहायला मिळेल. कामाच्या तुम्हाला ऑर्डर्स मिळत राहतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
