Akshaya Tritiya 2025 Lucky Zodiacs : हिंदू धर्मशास्त्रानुसार, 30 एप्रिल 2025 चा दिवस फार शुभ असणार आहे. कारण या दिवश साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण म्हणजेच अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya)दिवस असणार आहे. या दिवशी लक्ष्मी नारायण योग, गजकेसरी योग, सर्वार्थ सिद्धी योग यांसह अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या स्थितीचा काही राशींना चांगला लाभ मिळणार आहे. या दिवशी कोणत्या राशींसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ असणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांना चांगला धनलाभ होणार आहे. या राशीच्या व्यवसायात झपाट्याने वाढ झालेली दिसेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रगतीचे अनेक मोठे मार्ग उपलब्ध होतील. प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होतील. या काळात तुमचं बॅंक बॅलेन्स देखील वाढेल. तसेच, तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला धनलाभ होईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस फार महत्त्वाचा अणार आहे. या दिवशी तुम्ही फार उत्साही असाल. सकाळपासूनच प्रसन्नतेचं वातावरण असेल. तसेच, तुम्ही नियोजित केलेली कामे वेळेत पूर्ण होतील. या काळात तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी देखील करु शकता. प्रॉपर्टीच्या संदर्भात देखील तुम्ही विचार करु शकता.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस फार खास असणार आहे. या काळात तुम्हाला तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे परत मिळतील. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. जर तुम्हाला नवीन वाहन किंवा संपत्ती खरेदी करायची असल्यास हा काळ तुमच्यासाठी फार शुभ काळ ठरणार आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक उन्नतीचा असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. तसेच, नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी देखील हा काळ चांगला असणार आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस फार चांगला ठरणार आहे. या दिवसापासून तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होईल. तसेच, तुम्ही नवीन प्रोजेक्टची सुरुवात करु शकता. या काळात तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी सहज साध्य करु शकता. तुमच्यावर कोणाचाच दबाब असणार नाही. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
