Akshaya Tritiya 2025 : वैदिक पंचांगानुसार, 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya)दिवस आहे. या तिथीला कोणतंही कार्य करणं शुभ मानलं जातं. या दिवशी जर तुम्ही कोणतेही कार्य हाती घेतलं तर ते यशस्वीरित्या पार पाडतं. यंदा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तीन शुभ योग जुळून येणार आहेत. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि शोभन योगाचा अद्भूत संयोग जुळून येणार आहे. हा दुर्लभ संयोग अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अधिक खास असणार आहे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केले जाणारे उपाय नेमके कोणते आहेत या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात.
घरात 'या' ठिकाणी दिवा लावा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी भरुन सूर्याला अर्घ्य द्या. यामुळे तुमची सर्व संकटांपासून मुक्ती होईल. घरातील मुख्य ठिकाण जसे की, देवघर, देवाचा देव्हारा या ठिकाणी तुपाचा दिवा लावावा. यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल.
खाण्या-पिण्याच्या गोष्टी दान करा
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही गूळ, तांदूळ, सोनं, तूप, पाणी आणि वस्त्र दान करु शकता. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात सुख-शांती टिकून राहते. तसेच, या दिवशी दान केल्यास घरात अन्नाची कमतरता भासत नाही. घरात धनसंपत्ती टिकून राहते.
सोनं-चांदी दान करा
मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं-चांदी दान करणं फार शुभ मानलं जातं. असं म्हणतात की या दिवशी सोनं दान केल्याने आर्थिक संकट दूर होते. तसेच, तुम्ही पाणीदेखील दान करु शकता. या दिवशी गरजूंना पाणी पाजणं पुण्याचं काम मानलं जातं.
तूप दान करणं
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुपाचं दान करणं फार फलदायी मानलं जातं. हा उपाय केल्याने आपल्या जीवनात समृद्धी येते. तसेच, आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होते. याशिवाय हे उपाय केल्याने देवी लक्ष्मीची सदैव कृपा राहते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
