Akshaya Tritiya 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya)दिवस फार खास असणार आहे. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. त्यानुसार, यंदा 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी उपवास ठेवून धनदेवता कुबेर आणि भगवान विष्णूची पूजा करतात. तसेच, हा दिवस नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी, वस्तूंची खरेदी करण्यासाठी फार शुभ मानला जातो.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि धनदेवता कुबेराची पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जर राशीनुसार काही उपाय केले तर, तुमच्या धनसंपत्तीत, आरोग्य आणि कुटुंबाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. जाणून घेऊयात या दिवशी कोणता उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
मेष रास (Aries Horoscope)
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी गव्हाचं दान करावं. आणि संध्याकाळी तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांनी दुधापासून बनलेली मिठाई किंवा दूध दान करावं. यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीने हिरवे मूग दान करावेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मूग दान करणं फार शुभ मानलं जातं. यामुळे बुध देवाची विशेष कृपा राहते.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांनी तांब्या भरुन आणि चण्यांबरोबर गुळाचं देखील दान करावं. यामुळे तुमच्या कुंडलीतील बृहस्पती ग्रह मजबूत होतो.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांनी गरजू व्यक्तीला काळ्या रंगाची छत्री दान करावी. यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती चांगली राहील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांनी गरजू लोकांना किंवा एखाद्या ब्राह्मणाला खीर भोजन म्हणून द्यावी. यामुळे तुम्हाला पुण्य फळ मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांनी बूटं किंवा चपला दान कराव्यात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या वस्तू दान करणं शुभ मानतात.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांनी धनदेवता कुबेराची पूजा करावी. तसेच, केळी दान करावेत. यामुळे गुरु ग्रहाची तुमच्यावर विशेष कृपा राहील.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांनी चण्याची डाळ दान करावी, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांनी कपडे किंवा धान्य दान करावं. यामुळे तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांनी चणे किंवा गूळ दान करावा. यामुळे तुमची आर्थिक संकटापासून सुटका होईल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांनी देखील चणे किंवा गुळाचं दान करावं. यामुळे बृहस्पती देवाची कृपा तुमच्यावर राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
