Akshay Tritiya 2026: आजची अक्षय्य तृतीया दुप्पट भाग्याची! सोने-चांदी खरेदीचा 'हा' शुभ मुहूर्त, फार कमी लोकांना माहित, देवी लक्ष्मीच्या कृपेने भरभराट..
Akshay Tritiya 2026: मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने, चांदी, नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या वस्तु खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया...

Akshay Tritiya 2026: आज अक्षय्य तृतीया... हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि अत्यंत शुभ सण... “अक्षय्य” म्हणजे कधीही न संपणारे, म्हणजेच या दिवशी केलेले पुण्य, दान, खरेदी, जप, तप आणि शुभ कार्य यांचे फळ अक्षय्य मानले जाते. याचे धार्मिक महत्त्व पाहता, या दिवशी भगवान विष्णु आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. हा दिवस भगवान परशुराम यांचा जन्मदिवस म्हणजेच परशुराम जयंती म्हणूनही साजरा होतो. या दिवशी सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. नवीन व्यवसाय, घर खरेदी, गुंतवणूक यांसारख्या कामांची सुरुवात केल्यास दीर्घकाळ फायदा होतो असे मानले जाते. आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी सोने-चांदी खरेदी शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास संपत्तीत वाढ होत जाते. तर जाणून घेऊया हा शुभ मुहूर्त...
अक्षय्य तृतीया 2026 शुभ मुहूर्त, सोने- चांदी खरेदी करण्याचा मुहुर्त (Akshay Tritiya 2026 Gold Buying Time)
अक्षय्य तृतीया तिथी प्रारंभ: 19 एप्रिल 2026 सकाळी 10:49 वाजता.
अक्षय्य तृतीया तिथी समाप्ती : 20 एप्रिल 2026, सकाळी 07:27 वाजता.
अक्षय्य तृतीया पूजा मुहूर्त : सकाळी 10:49 ते दुपारी 12:20 पर्यंत
सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त : 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:49 पासून ते 20 एप्रिलच्या सकाळी 06:16 पर्यंत सोने खरेदी करणे अत्यंत शुभ असेल.
सर्वात श्रेष्ठ आणि शक्तिशाली मुहूर्त - सकाळी 10:40 ते दुपारी 12:20
पर्यायी शुभ वेळ - सकाळी 6:00 ते 10:30 (सूर्योदयानंतर)
दागिने, गुंतवणूक, शुभ वस्तू खरेदीसाठी योग्य - सायंकाळी 5:30 ते 7:00
महत्त्वाचे: अक्षय्य तृतीया हा “अबूझ मुहूर्त” आहे, म्हणजे संपूर्ण दिवस शुभ असतो, तसं पाहायला गेलं तर वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते.
भाग्यशाली राशी
अक्षय्य तृतीया दिवशी ग्रहस्थितीमुळे खालील राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता:
वृषभ (Taurus)
आर्थिक प्रगती, संपत्ती वाढ
गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ
कर्क (Cancer)
कुटुंबातील सुख-समृद्धी वाढ
घर/प्रॉपर्टीचे योग
सिंह (Leo)
करिअरमध्ये यश, प्रतिष्ठा वाढ
नवीन कामाची सुरुवात फायदेशीर
कन्या (Virgo)
धनलाभ आणि बचत वाढ
व्यवसायात सकारात्मक बदल
मकर (Capricorn)
दीर्घकालीन फायदे, स्थिरता
नवीन योजना यशस्वी होण्याची शक्यता
ही वाचा
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस..5 राशींच्या संपत्तीचा वेग डबल, पैसा दुप्पट! पॉवरफुल मालव्य राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, प्रेम फर्स्ट क्लास...कोण मालामाल?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















