Adhik Maas Shivratri 2026: 12 कि 13 जून...अधिक मास शिवरात्री शक्तिशाली! 3 पॉवरफुल महासंयोग, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा, जलाभिषेक वेळ, महत्त्व..
Adhik Maas Shivratri 2026: अधिक मास शिवरात्री नेमकी कधी आहे? 3 महासंयोग तयार होत आहेत, जलाभिषेकाची अचूक वेळ आणि पूजेचे महत्त्व जाणून घ्या.

Adhik Maas Shivratri 2026: अधिक मास... हिंदू धर्मात सर्वात महत्त्वाची मानला जाणारा महिना... जो दर 3 वर्षांनी येतो... धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासात येणारे सर्व सण, तिथी, उपवास अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. अधिक मासातली एकादशी असो...अमावस्या असो.. कि शिवरात्री..अधिक मासात येणाऱ्या मासिक शिवरात्रीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. यावर्षी ही तारीख अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानली जात आहे, कारण 27 वर्षांनंतर याच दिवशी अनेक महासंधी येत आहेत. तर, यावर्षी अधिक मास शिवरात्री कधी आहे आणि जलाभिषेकाची वेळ काय आहे? सर्वकाही जाणून घेऊया.
12 किंवा 13 जून? अधिक मास शिवरात्री कधी आहे? (Adhik Maas Shivratri 2026)
हिंदू पंचांगानुसार, यावर्षी ज्येष्ठ अधिक मासाचा पवित्र काळ सुरू आहे. अधिक मासात, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, मासिक शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते. वैदिक पंचांगानुसार, ज्येष्ठ अधिक मासाची (ज्येष्ठ महिन्याची) चतुर्दशी तिथी शनिवार, 13 जून 2026 रोजी दुपारी 4:07 वाजता सुरू होईल आणि 14 जून रोजी दुपारी 12:19 पर्यंत चालेल. धार्मिक शास्त्रानुसार, प्रदोष काळात शिवरात्रीचा उपवास आणि पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळे, उदय तिथीवर प्रदोष काळाचे महत्त्व लक्षात घेता, अधिक मासातील मासिक शिवरात्री 13 जून 2026 रोजी साजरी केली जाईल.
3 महासंयोगाचा महासंगम... शनिदेवाचा आशीर्वाद आणि शिवाची भक्ती...
पंचांगानुसार, या वर्षी शनिवारी शिवरात्री आल्याने शनिदेवाचा आशीर्वाद आणि शिवाची भक्ती यांचा एक अद्भुत संगम होतो, ज्यामुळे साडेसाती किंवा ढैयाच्या दुःखातून मुक्ती मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी 'गौरी योग' तयार होत असतो, जो वैवाहिक सुख आणि सुदैवासाठी अत्यंत शुभ मानला जातो. पुरुषोत्तम मासात केलेल्या पूजेचे फळ सामान्य दिवसांपेक्षा कित्येक पटीने अधिक मानले जाते. आत्मसाक्षात्कार आणि मोक्षासाठी हा काळ सर्वोत्तम आहे.
अधिक मास शिवरात्री भाग्यशाली राशी...
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस आत्मविश्वास आणि यश घेऊन येऊ शकतो. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक लाभाचे संकेत असून समाजात मान-सन्मान वाढू शकतो.
तूळ
तूळ राशीला भाग्याची उत्तम साथ मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक व्यवहारांमध्ये फायदा होईल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
धनु
धनु राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. शिक्षण, प्रवास आणि परदेशाशी संबंधित कामांमध्ये यश मिळण्याचे योग आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
मेष
मेष राशीसाठी हा दिवस नवीन संधी घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरणही आनंदी राहील.
मीन
मीन राशीच्या व्यक्तींना मानसिक समाधान आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसून येतील.
जलाभिषेक आणि पूजेची योग्य वेळ कोणती आहे?
जर तुम्ही अधिक मासात शिवरात्रीला पूजा करत असाल, तर जलाभिषेकासाठी शुभ वेळ जाणून घ्या...
- निशित काळ: रात्री 11:01 ते 12:41 पर्यंत
- ब्रह्म मुहूर्त: पहाटे 4:02 ते 4:42 पर्यंत
- अभिजीत मुहूर्त: दुपारी 11:53 ते 12:49 पर्यंत
पूजेचे महत्त्व
शिवपुराणानुसार, अधिक मासात भगवान शिवाची पूजा केल्याने केवळ मानसिक शांतीच मिळत नाही, तर जीवनातील सर्व नकारात्मक अडथळेही दूर होतात. या दिवशी शिवलिंगाला गंगाजल, कच्चे दूध, मध, दही आणि तूप यांचा अभिषेक करावा. 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा जप करत बेलपत्र, धोतरा आणि पांढरे चंदन अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
हेही वाचा
Adhik Maas Amavasya 2026: 15 जूनच्या अधिक मास अमावस्येला 3 वर्षांनी पॉवरफुल योग! 5 राशींची पाचही बोटं तुपात, भोलेनाथांचं प्रचंड पाठबळ, तिथी, महत्त्व, शुभ योग जाणून घ्या...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















