Adhik Maas Ekadashi 2026 : अधिक मास एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 'हा' उपाय लाभदायक; भगवान विष्णूची सदैव राहील कृपा
Adhik Maas Ekadashi 2026 : पंचांगानुसार, आज अधिक मास एकादशी आहे. त्यामुळे आजच्या दिवसाच्या तिथीचा शुभ मुहूर्त, विधी, परंपरा आणि उपाय जाणून घेऊयात.

Adhik Maas Ekadashi 2026 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, भगवान विष्णूच्या (Lord Vishnu) पूजेसाठी गुरुवारचा दिवस, एकादशी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. पंचांगानुसार, आज अधिक मास एकादशी आहे. त्यामुळे आजच्या दिवसाच्या तिथीचा शुभ मुहूर्त, विधी, परंपरा आणि उपाय जाणून घेऊयात.
अधिक मास एकादशी शुभ मुहूर्त
ज्येष्ठ अधिक मासाच्या कृष्णपक्षाची एकादशी तिथी 11 जून 2026 रोजी पहाटे सुरु झाली आहे. तर, ही तिथी आज रात्री 10 वाजून 36 मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच, पुढच्या दिवशी 12 जून 2026 रोजी शुक्रवारी सकाळी 5 वाजून 23 मिनिटांपासून ते 8 वाजून 10 मिनिटांपर्यंत असणार आहे.
'अशी' करा भगवान विष्णूची पूजा
जर तुम्हाला अधिक मास एकादशीचं पुण्य फळ प्राप्त करायचं असेल तर या व्रताशी संबंधित काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. हिंदू धर्म मान्यतेनुसार, या दिवशी पूर्व संध्याकाळपासून अन्नाचं सेवन करु नये. सूर्योदयाच्या आधी उठावे. गंगा स्नान करावे.
अधिक मास एकादशीला 'हा' उपाय करा
हिंदू धर्ममान्यतेनुसार, जर तुम्हाला एखाद्या देवाला प्रसन्न करायचं असेल तर त्यासाठी दान करणं महत्त्वाचं आहे. तसेच, अधिक मास एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र, पिवळी फळं, मिठाई, चण्याची डाळ तसेच गुळाचं दान करु शकता.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Somavati Amavasya 2026 : यंदाची सोमवती अमावस्या 14 की 15 जूनला? अमावस्येच्या दिवशी नेमकं काय करावं? वाचा शुभ तिथी आणि वेळ आणि महत्त्व



















