Adhik Maas Amavasya 2026: सध्या अधिक मास सुरू आहे, आणि हा महिना आता लवकरच संपणार आहे. या महिन्याच्या शेवटी जी अमावस्या येतेय, ती हिंदू धर्म आमि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत खास असणार आहे, कारण यंदा या अमावस्येला 3 वर्षांनी एक दुर्मिळ योगायोग घडतोय, धार्मिक मान्यतेनुसार, हा विशेष योग अंदाजे दर तीन वर्षांनी येतो. अधिक मास भगवान विष्णूला समर्पित मानला जातो, तर अमावस्या तिथीला पूर्वजांच्या शांतीसाठी, प्रार्थना करण्यासाठी आणि दानधर्म करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. ज्योतिषींच्या मते, या अमावस्येला दुर्मिळ शुभ योग निर्माण होणे हे 5 राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे, जाणून घ्या भाग्यशाली राशींबद्दल...
अमावस्येला 3 वर्षांनी एक दुर्मिळ योग...(Adhik Maas Amavasya 2026)
ज्योतिषशास्त्रानुसार, 15 जून, 2026 रोजी सोमवती अमावस्येला एक दुर्मिळ योगायोग निर्माण होतोय. तो योगायोग म्हणजे ही अमावस्या सोमवारी येत असल्याने ती सोमवती अमावस्या म्हटली जाईल तर यासोबतच ज्येष्ठ अधिक मास एकाच वेळी येत आहेत. हा प्रसंग पूर्वजांना प्रार्थना करणे, स्नान करणे, दान करणे आणि भगवान विष्णू, शिवाची पूजा करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. 15 जून रोजी सोमवती अमावस्या आणि ज्येष्ठ अधिक मास (पुरुषोत्तम महिना) एकाच वेळी येत आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, हा विशेष योग अंदाजे दर तीन वर्षांनी येतो. अधिक मास भगवान विष्णूला समर्पित मानला जातो, तर अमावस्या तिथीला पूर्वजांच्या शांतीसाठी, प्रार्थना करण्यासाठी आणि दानधर्म करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. त्यामुळे, सोमवती अमावस्या आणि अधिक मास एकाच वेळी येणे अत्यंत शुभ मानले जाते.
ज्येष्ठ सोमवती अमावस्येची तिथी...
ज्योतिषींच्या माहितीनुसार, ज्येष्ठ अधिक मासाची अमावस्या 14 जून रोजी दुपारी 12:20 वाजता सुरू होईल आणि 15 जून रोजी सकाळी 8:24 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, सोमवती अमावस्या 15 जून रोजी साजरी केली जाईल. ही अमावस्या सोमवारी येत असल्याने, तिचे धार्मिक महत्त्व वाढते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, भगवान शिव आणि विष्णूची पूजा करणे, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे, तर्पण करणे आणि दान करणे यामुळे विशेष पुण्य मिळते.
अधिक मास अमावस्या : 5 भाग्यशाली राशी
सिंह (Leo)
ज्योतिषशास्त्रानुसार, अधिक मास अमावस्येच्या दिवशी सिंह राशीच्या व्यक्तींना भाग्याची विशेष साथ मिळू शकते. करिअरमध्ये सुरू असलेल्या अडचणी कमी होतील आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना नवीन ग्राहक किंवा फायदेशीर करार मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या रखडलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घेतल्यास मानसिक समाधान मिळेल.
तूळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीसाठी हा दिवस सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. नोकरीत प्रगतीचे संकेत असून नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात विस्ताराच्या योजना यशस्वी ठरू शकतात. आर्थिक लाभाचे चांगले योग आहेत. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतात. एखादे जुने स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius)
ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या व्यक्तींना गुरुच्या शुभ प्रभावामुळे अनेक क्षेत्रांत यश मिळू शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. परदेश, शिक्षण किंवा प्रवासाशी संबंधित कामांमध्ये प्रगती होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी घडतील. आध्यात्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल.
मेष (Aries)
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीसाठी हा दिवस उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात किंवा वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. व्यवसायिकांना आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबातील मतभेद कमी होतील. आरोग्य चांगले राहील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
मीन (Pisces)
ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या व्यक्तींना अधिक मास अमावस्येच्या दिवशी आध्यात्मिक लाभ मिळू शकतो. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांकडून सहकार्य मिळेल. घरात धार्मिक किंवा शुभ कार्याचे आयोजन होऊ शकते. मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल.
सोमवती अमावस्येचे महत्त्व
- हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व आहे.
- या दिवशी उपवास करणे, पूजा करणे आणि पवित्र ठिकाणी स्नान केल्याने मोठे फायदे मिळतात.
- स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात.
- पूर्वजांच्या पापांपासून आणि ऋणांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही हा दिवस शुभ मानला जातो.
- या दिवशी केलेले दान, स्नान आणि पूजा मनाला शांती देतात आणि नकारात्मक विचार दूर करतात.
- भक्तांनी आपापल्या भागातील पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि धार्मिक स्थळे व मंदिरांना भेट द्यावी.
अमावस्येचे ज्योतिषीय महत्त्व
ज्योतिषशास्त्रानुसार, अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतात. सूर्य अग्नी तत्त्वाचे प्रतीक आहे, तर चंद्र शीत तत्त्वाचे प्रतीक आहे. या वेळी चंद्राचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे मन एकाग्र करणे सोपे होते. त्यामुळे, अमावस्या आध्यात्मिक साधना आणि आत्मपरीक्षणासाठी शुभ मानली जाते. सध्या अधिक मास सुरू आहे. या महिन्यात येणारी सोमवती अमावस्या हा एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग मानला जातो. असा प्रसंग साधारणपणे दर तीन वर्षांनी एकदा येतो, जेव्हा अधिक मासाची अमावस्या सोमवारी येते. धार्मिक दृष्टिकोनातून, हा योग अत्यंत फलदायी मानला जातो.
हेही वाचा
Weekly Horoscope: जूनचा तिसरा आठवडा सर्वात पॉवरफुल, 6 राशींचं नशीब पालटणार! अमावस्येसह ग्रहांचे अद्भूत राजयोग, दत्तगुरूंचं पाठबळ, साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
