Adhik Maas 2026: 17 मे पासून सुरू झालेला अधिक मास आता 15 जूनला संपतोय..हिंदू धर्मात या अधिक मासाला मोठे महत्त्व आहे. या महिन्यात दानधर्म, जप-तप आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवता किंवा कुलस्वामिनीची ओटी भरण्याची परंपरा आहे. मात्र इतर काही कारणांमुळे कुलदेवतेच्या ठिकाणी जाऊन ओटी भरता आली नसेल, तर निराश होऊ नका, कारण ज्यांना आपल्या कुलदेवी देवस्थानच्या ठिकाणी ओटी भरणे शक्य नाही, ते घरच्या घरी सुद्धा देवाची ओटी भरू शकतात. याबाबतचे सविस्तर संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
कुलदेवीला जायचं राहून गेलं तर...? (Adhik Maas 2026)
अधिक महिना संपण्यापूर्वी खरं तर कुलदेवीची ओटी भरायला हवी. मात्र असा प्रश्न पडतो. की देवाची ओटी केव्हा आणि कोणत्या ठिकाणी भरावी? तुमचं कुलदैवत ज्या ठिकाणी असेल त्याठिकाणी तुम्ही दर्शनाला जाता. तर त्या ठिकाणी ओटी भरायचीच आहे, पण काही कारणास्तव त्या ठिकाणी जाणे शक्य नसेल तर जर तुम्ही घरी सुद्धा कुलदेवतेची ओटी भरू शकता.
कुलदेवतेची ओटी कधी आणि कशी भरावी?
- कुलदेवतेची ओटी भरणे ही अनेक मराठी कुटुंबांतील श्रद्धेची परंपरा आहे.
- विशेषतः अधिक मास, श्रावण महिना, नवरात्र, पौर्णिमा किंवा कौटुंबिक मंगलकार्याच्या वेळी कुलदेवतेची ओटी भरली जाते.
- जर तुमच्याकडे कुलदेवी किंवा कुलदेवतेचा फोटो असेल तर तुम्ही घेऊ शकता.
- जर तुमच्या कुलदेवतेचा फोटो नसेल तर त्याचे टाक असेल तर त्यासमोर देखील तुम्ही ओटी भरू शकता.
- जर कुलदेवतेचा फोटो किंवा टाक दोन्ही नसेल तर देवी लक्ष्मीची ओटी भरली तरी चालते.
ओटी भरण्यासाठी लागणारे साहित्य
- हळद-कुंकू
- नारळ
- खण किंवा साडी
- तांदूळ (अक्षता)
- सुपारी
- फुले, हार
- फळे
- दक्षिणा (शक्यतेनुसार)
ओटी भरण्याची पद्धत
- प्रथम कुलदेवतेची विधिवत पूजा करावी.
- देवतेला हळद-कुंकू, फुले आणि अक्षता अर्पण कराव्यात.
- खण किंवा वस्त्र देवतेसमोर अर्पण करावे.
- त्या खणावर नारळ, सुपारी, तांदूळ, फळे आणि दक्षिणा ठेवावी.
- मनोभावे कुलदेवतेचे स्मरण करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी.
- आरती करून पूजा पूर्ण करावी.
कुलदेवता ही संपूर्ण कुळाची रक्षणकर्ती
धार्मिक मान्यतेनुसार, कुलदेवता ही संपूर्ण कुळाची रक्षणकर्ती मानली जाते. त्यामुळे तिची ओटी भरणे म्हणजे कुटुंबाच्या कल्याणासाठी, सुख-समृद्धीसाठी आणि वंशवृद्धीसाठी आशीर्वाद मागणे असे मानले जाते. अधिक मासात कुलदेवतेची ओटी भरल्यास विशेष पुण्य प्राप्त होते, अशी लोकश्रद्धा आहे.
हेही वाचा
