Unseasonal Rain Crop Loss : चक्रीवादळामुळे (Cyclone) राज्यभरात अवकाळी पावसाचा कहर (Heavy Rain) सुरु आहे, त्यामुळे शेतकरी (Farmers) संकटात सापडलं आहे. हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजनुसार पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. हलका मध्यम स्वरूपाचा या पावसाला सुरुवात झाली आहे. आधीच अवकाळी पावसाने शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदील झाला आहे. आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली होताना दिसत आहे. रब्बी हंगामात हरभरा, गहू, तूर आणि भाजीपाला पीक अवकाळी पावसामुळे खराब झाले होते. आता पुन्हा अवकाळी पाऊस बरसल्याने उरलं सुरलेलं पीक हातचं जात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


पावसाच्या लहरीपणामुळे रासायनिक खताच्या मागणीवर परिणाम


अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाच्या लहरीपणामुळे उशिरा झालेल्या पेरण्या आणि संभाव्य टंचाईचा परिणाम रासायनिक खताच्या मागणीवरही झाला आहे. खरीप आणि रब्बी हंगामात 2020 मध्ये 4.33 लाख मेट्रिक टन खताचा वापर झाला होता. यंदा मात्र, या वापरात कमालीची घट होऊन अवघा 1 लाख 2 हजार 930 मेट्रिक टन एवढाच खताचा वापर झाला आहे. यंदा महिनाभर उशिरा पाऊस दाखल झाल्यामुळे पेरण्याही उशिराच झाल्या, त्यातही विस्कळीत स्वरूपाचे पर्जन्यमान राहिल्याने खताच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. यंदा अवघा 91 टक्केच पाऊस झाला. ऐन पावसाळ्यात पावसाने 20 दिवसापेक्षा अधिक खंड दिल्यामुळे खरिपाची पिके करपली. तसेच ओढे-नाले आणि तलाव कोरडेच राहिल्याने रब्बीही संकटात आहे. कृषी विभागाकडे युरिया, एमओपी, एसएसपी, डीएपी, संयुक्त खतांचा वापर आणि शिल्लक यांची नोंद आहे. त्यानुसार खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात खताची मागणी कमी राहिल्याचं स्पष्ट झालं आहे.


हरभऱ्याच्या पिकावर फिरवला रोटावेटर


हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यात जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला आहे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे नुकसान झाला आहे या पावसाचा फटका हरभऱ्याच्या पिकाला सुद्धा बसल्याचे पाहायला मिळते जोरदार स्वरूपाच्या झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणच्या हरभऱ्याला मर रोगाने ग्रासले असून हरभऱ्याची झाडे आपोआप पिवळी पडून वाळत आहेत त्यामुळे गलांडी शिवारातील शेतकरी प्रमोद देव यांनी त्यांच्या शेतातील पाच एकर वरील हरभऱ्याच्या पिकावर रोटावेटर फिरवले आहे


नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचा रास्ता-रोको


नाशिकमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी रास्ता - रोको केला आहे. नाशिक -  संभाजीनगर महामार्गावरील निफाड येथे शेतकऱ्यांनी रास्ता - रोको आंदोलन केलं आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी, तसेच शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अत्यल्प असून त्यात वाढ करण्यात यावी, पीक विमा कर्ज शेतकऱ्यांचे माफ करावे. वीज बिल माफ करावे, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिक - संभाजीनगर महामार्गावरवरील निफाडच्या शांतीनगर चौफुली येथे रास्ता - रोको आंदोलन केले. या रास्ता - रोको आंदोलनामुळे नाशिक - संभाजीनगर महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत केली.