Buldhana : एकीकडं पावसानं (Rain) ओढ दिल्यानं राज्यातील शेतकरी संकटात आहे, तर दुसरीकडं सरकारच्या धोरणांचा देखील राज्यातील बळीराजाला फटका बसतोय. अशातच काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं नुकसान केल्याच्या घटना देखील घडत आहे. एक अशीच घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भुमराळा इथं घडलीय. शेतकरी सतीश भोसले यांच्या शेतातील नेट शेडमधील मिरचीची झाडे अज्ञाताने कापून टाकली (destroyed chillies crops) आहेत. याचा मोठा फटका सतीश भोसले यांना बसला असून, त्याचं तब्बल पाच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. 


नेट शेडमधील 535 झाडे टाकली कापून 


लोणार तालुक्यातील भुमराळा येथील शेतकरी सतीश भोसले यांच्या शेतात त्यांनी मिरचीचे बियाणे घेण्यासाठी इस्ट वेस्ट कंपनीची 535 झाडे लावली होती. ही झाडे दोन महिन्यापूर्वी लागवड करण्यात आली होती. मात्र, काल (29 सप्टेंबर) रात्री अज्ञात व्यक्तीने नेट शेडमधील 535 झाडे कापून टाकली आहेत. यामुळं या शेतकऱ्याचं अंदाजे पाच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. सतीश भोसले यांनी याप्रकरणी कृषी विभागाकडं तक्रार करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


केळी पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव,उत्तर महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत; कोट्यवधी रुपयांचे नुकसान