Facebook Dindi : दरवर्षी होणारा पालाखी सोहळा हा वारकऱ्यांसाठी आनंदाचा असतो. मोठ्या संख्येनं वारकरी या सोहळ्यासाठी आळंदी आणि देहूत दाखल होत असतात. त्यानंतर ते आळंदी किंवा देहूतून वारकरी पालखीबरोबर पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतात. यावेळी 21 जून संत ज्ञानेश्वरर महाराजांची पालखी तर 20 जूनला संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्तान होणार आहे. दरम्यान, या पालखी सोहळ्यात विविध कार्यक्रम, उपक्रम देखील राबवले जातात. दरवर्षी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून वारीचे फोटो आणि व्हीडिओ काढले जातात. तसेच वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील फेसबुक दिंडीच्या माध्यमातून केले जातात. यावर्षी मात्र, फेसबुक दिंडींच्या माध्यमातून अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. यंदा 'वारीतला पोशिंदा' अशी संकल्पना फेसबुक दिंडीच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.
 
यावर्षी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे 337 वे वर्ष आहे. तर फेसबुक दिंडीचे हे 12 वे वर्ष आहे. वारीचे फोटो आणि व्हीडीओसोबत प्रत्येक वर्षी एक सामाजिक जाणीव ठेऊन आतापर्यंत  फेसबुक दिंडीनं विविध उपक्रम राबवले आहेत. पाणी वाचवा, वारी 'ती' ची, देह पंढरी, नेत्रवारी ,आधार वारी  या उपक्रमातही भाविक सहभागी झाले होते.




यावर्षी कसा आहे फेसबुक दिंडीचा उपक्रम 


यावर्षी वारीतला पोशिंदा ही संकल्पना फेसबुक दिंडीच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची ओळख, व्याख्या काय? तर, वारी करतो तो महाराष्ट्र. तसेच वारकरी म्हणजेच शेतकरी आणि शेतकरी म्हणजेच वारकरी. काळ्या मातीत घाम गाळून शेतकरी जगाचा पोशिंदा, अन्नदाता बनला. मात्र हे 'पोशिंदा'पण सोपं नाही. त्यासाठी त्याला असंख्य संकटं झेलावी लागतात. कोरोनाच्या काळात सर्व काही थांबलं होतं. फक्त थांबलं नव्हतं ते, शेतकऱ्याचं काम. या पोशिंद्याला संकटांशी झुंजण्याचं बळ, ऊर्जा मिळते ती पंढरीच्या वारीतून. विठु माऊलीच्या दर्शनानं त्याच्या अंगात हजार हत्तींचं बळ संचारतं आणि प्रतिकूल परिस्थितीवरही तो कर्तृत्त्वाचा झेंडा उभारतो. जगाला प्रेरणा देणाऱ्या या पोशिंद्याच्या प्रेरणादायी कहाण्या आम्ही यंदाच्या वारीच्या निमित्ताने फेसबुक दिंडीच्या माध्यमातून समोर आणणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळं आमच्या 'पोशिंदा' या अभियानात सहभागी होण्यासाठी, शेतकरी वारकऱ्याला सलाम करण्यासाठी आमच्यासोबत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी फेसबुक दिंडी टिमचे स्वप्नील मोरे , मंगेश मोरे , अमित कुलकर्णी, सूरज दिघे, अमोल निंबाळकर, संतोष पाटील, अमोल गावडे, राहुल बुलबुले, ओंकार महामुनी, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण हे कार्यरत आहेत. 




फेसबुक दिंडीचं नवं गाण  'वारी चुकायाची नाही'  


 फेसबुक दिंडीचं नवं गाण देखील यावर्षी येणार आहे.  'वारी चुकायाची नाही'  असं हे गाणं आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट, वाडेबोल्हाई, पुणे श्री अमोल काशीनाथ गावडे आणि स्पंदन स्टुडीओ, नाशिक यांनी निर्मित केलं आहे. सुप्रसिद्ध गीतकार क्षितिज पटवर्धन, संगीत देवबाभळी या संगीत नाटकाचे संगीत दिग्दर्शक आनंदजी ओक आणि फत्तेशिकस्त, पावनखिंड या चित्रपटातील गाण्यांचे  गायक अवधूत गांधी यांचे स्वर लाभलेलं ही गाणं लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. 


महत्वाच्या बातम्या: