Monsoon News : गेल्या 24 तासात मुंबई ठाणे आणि परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. राज्यातही हलका ते मध्यम पाऊस पडला असून, दक्षिण कोकणात थोडा जास्त पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात सगळीकडं मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. याबाबत भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी माहिती दिली आहे. 


उद्यापासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग वाढणार


सक्रिय मान्सूनची स्थिती पाहता, 18 जून 2022 पासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत प्रदेशात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति अतिवृष्टीसह व्यापक पर्जन्यवृष्टी अपेक्षित असल्याचं मत पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे.


 








राज्याच्या काही भागात दमदार पाऊस


राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळं शेतीकामांना वेग आला आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात मुळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पाच तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं साखरखेर्डा येथील भोगावती नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळं वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. अद्यापही काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नाही. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसानं दरदार हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, सांगली, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं लवकरच खरीपाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. 




दरम्यान, या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीकामांना वेग आला आहे. खरीपाची पेरणी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्याठिकाणचे शेतकरी पावसाची वाड बघत आहेत. दरम्यान, 75 ते 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.


महत्वाच्या बातम्या: