Weather Updates : राज्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाचा चटका वाढल्यानं लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, राज्यात 28 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच वाऱ्याचा वेग देखील वाढणार आहे. 28 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत राज्यात 38 अंशपासून 44 अंश पर्यंत तापमान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं वाढणाऱ्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेणं गरजेचं आहे.


हळद, हरभरा, गहू आणि ज्वारीची काढणी करावी


उन्हाचा चटका वाढल्या उकाड्यातही वाढ झाली आहे. त्यामुले या वाढत्या तापमानाच्या काळात नागरिकांना स्वत: सह लहान मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच हळद, हरभरा, गहू, करडी आणि ज्वारी ही पिके काढणीस आली आहेत. पुढच्या आठ दिवसात शेतकऱ्यांनी शेतातली आपापली पिकं काढूण घ्यावी असे देखील सांगण्यात आले आहे.
                              
दरम्यान, राज्यात 29 मार्चपर्यंत सांगली, पुणे कराड, विटा, जत, आटपाडी, सोलापूर, इस्लापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, वाई आणि सातारा या भागात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. तर 29 मार्चपासून उन्हाचा पारा वाढून वारे जोराने वाहु लागतील. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढताना दिसत आहे. हळूहळू तापमानात वाढ होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. 14 मार्चनंतर विदर्भात सूर्यनारायण भयंकर तापला असून अकोला आणि चंद्रपुरात सर्वोच्च तापमानाच्या नोंदी झाल्या आहेत. संपूर्ण राज्यात अकोल्याचा पहिला नंबर आहे. तापमान वाढीत मागील 5 दिवस सलग उच्चांकी नोंद अकोल्यात करण्यात आली आहे. 


23 मार्च ते 27 मार्च अकोल्यातील तापमान सर्वाधिक असल्याची भारतीय हवामान खात्याची नोंद आहे.  वायव्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम विदर्भात काही दिवसात सर्वाधिक तापमान होण्याची चिन्हं आहेत.  राजस्थानमधून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात बदल झाला आहे. 


दरम्यान, मागच्या तीन ते चार दिवसापूर्वी राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊसही झाला. त्याचा मोटा फटका राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे द्राक्ष तडकण्याची भिती व्यक्त केली जातेय. तसेच दरही कमी होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. ज्या भागांमध्ये द्राक्षाची काढणी झाली आहे, त्याठिकाणी पाऊस चांगला आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा अद्याप उतरल्या नाहीत त्यांच्यासाठी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस धोक्याचा ठरण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या: