Success Story: भारतातल्या अगदी कुठल्याही व्यक्तीचं आणि बॉलिवूडच्या कलाकारांशी असलेलं नातं काही वेगळच असतं. अगदी लहान मुलापासून ते अगदी शेतकऱ्यापर्यंत. मध्य प्रदेशच्या अविनाश  डांगी यांची गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. छोटयाशा बिस्तान नगरपरिषदेपासून काही किलोमिटरच्या अंतरावर राहणाऱ्या आणि पेशाने शेतकरी असणारा अविनाश वयाच्या 12 वर्षांचा असल्यापासून अभिनेता जॅकी श्रॉफचा फॅन. एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान जॅकी श्रॉफला  भेटण्याची संधी मिळाली आणि या शेतकऱ्याचं आयुष्यच बदललं. शुटिंगदरम्यान, अविनाश डांगी आणि अभिनेता जॅकी श्रॉफची भेट झाली. त्यांच्या संभाषणादरम्यान, अविनाशने तो शेतकरी असल्याचे जॅकी श्रॉफला सांगताच जॅकी श्रॉफ त्याला म्हणाला, पीकं ही लहान मुलासारखी असतात आणि त्यांना रासायनिक कीटकनाशके खायला देऊ नयेत. या गोष्टीचा अविनाशवर इतका परिणाम झाला की त्यानं नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला. आता अविनाश डांगी यांची शेती 25 एकरावर पसरली आहे. त्यात ते अनेक प्रकरची फळे आणि भाज्या पिकवतात. नैसर्गिक शेतीच्या उत्पादनांच्या मागणीमुळे या शेतकऱ्याला इतरांपेक्षा 30 टक्के अधिक नफा मिळत आहे. (Agriculture Success)

25 एकरात वेगवेगळ्या भाज्या फळे

नैसर्गिक शेती सुरु करणं सोपं नव्हतं. अविनाशने प्रथम कृषी शास्त्रज्ञांशी संपर्क साधला आणि माहिती गोळा केली. गावातील लोकांनी त्याच्या निर्णयाची आधी थट्टाच केली. एका अभिनेत्याच्या सल्ल्याने शेती कशी करता येईल? पण अविनाशनं त्याच्या निर्णयावर चांगली अंमलबजावणी करायचं ठरवलं. आधी घरासाठी नैसर्गिक भाज्या वाढवण्यासा सुरुवात केली. जेव्हा त्याला नैसर्गिक भाज्यांची चव आवडली तेंव्हा त्यानं या भाज्या बाहेर लोकांनाही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.  किसानतकच्या वृत्तानुसार, आता अविनाश डांगीची शेती 25 एकरांवर पसरली आहे. अविनाश शेतात विविध प्रकारच्या फळांची लागवड करतात. त्याच्या शेतात एकूण 14 प्रकारची फळझाडे आहेत, ज्यामध्ये पेरू, फणस, सीताफळ, संत्री, गोड लिंबू, लिंबू, ब्लॅकबेरी, आंबा, चिकू, नारळ आणि आवळा यांचा समावेश आहे. विविध फळपिकांमुळे त्याला वर्षभर उत्पादन मिळते, तसेच बाजारातील मागणीनुसार तो फळे विकू शकतात.फळबागेव्यतिरिक्त, ते 12 प्रकारच्या भाज्या देखील पिकवतात. त्याच्या फळबागेत कोबी, टोमॅटो, वांगी, भेंडी, मेथी, गाजर, कांदा आणि भोपळा ही आंतरपिके घेतली जातात. यामुळे त्याला अतिरिक्त उत्पन्न मिळते आणि जमिनीचा अधिक चांगला वापर होतो.

30 टक्के फायदा

अविनाश सांगतात, नैसर्गिक शेतीचे अनेक फायदे आहेत. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, पिकांची गुणवत्ता सुधारते आणि उत्पादन जास्त मिळते. रासायनिक शेतीच्या तुलनेत त्याच्या उत्पादनाला 30 टक्के अधिक दर मिळतो. "आम्ही बाजारावर अवलंबून नाही, आम्ही थेट ग्राहकांना माल विकतो." यामुळे त्याला चांगला नफा मिळतो आणि बाजारातील दलालांवर अवलंबित्व राहात नाही.शेतीसाठी आवश्यक असलेली नैसर्गिक खते आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी त्याच्याकडे 50 गायी आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या शेण आणि गोमूत्राचा वापर तो जीवामृत आणि घनामृत तयार करण्यासाठी करतो. यामुळे त्याच्या शेतात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळला जातो.

हेही वाचा:

Manikrao Kokate : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय माझा नाही; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी हात झटकले, म्हणाले की...