Soybean Procurement: सोयाबीन शेतकऱ्यांची हमीभावासाठी होणारी धडपड सुरुच असून सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ दिली असली तरी आता सोयाबीन खरेदीसाठी दोनच दिवस उरले असल्याने लातूरसह राज्यातील इतर बाजारसमित्यांमध्ये शेतकऱ्यांची एकच गर्दी उसळली आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा आहेत. काहींनी तर  खरेदी केंद्रांच्या आवारातच मुक्काम ठोकला आहे. (Soybean)

दरम्यान, आधी बारदाने नसल्याने राज्यात अनेक भागात खरेदी केंद्र ठप्प होती. तर नंतर सोयाबीन खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनला हमीभाव मिळण्यासाठी खरेदी केंद्राकडे धाव घेतली. परिणामी, सोयाबीनची तुफान आवक झाल्याने सोयाबीन हमीभावासाठी प्रचंड वेळ लागत असल्याने शेतकऱ्यांचा खोळंबा झाला. या परिस्थितीमुळे राज्य सरकारने त्यानंतर 31 जानेवारीची शेवटची मुदत 6 जानेवारी केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी सोयाबीन खरेदीसाठी केवळ दोन दिवस उरल्याने सोयाबीन घरातच राहण्याची शेतकऱ्यांना टांगती तलवार आहे. (Soybean Procurement)

राज्यात मंगळवारी  41 हजार 49 क्विंटल सोयाबीनची आवक

राज्यात मंगळवारी (3 फेब्रुवारी) तब्बल 41 हजार 49 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनची आवक प्रचंड वाढली आहे. सोमवारी तब्बल 75 हजार 621 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यात लातूर बाजारसमितीत तब्बल 15 हजार 904 क्विंटल पिवळा सोयाबीन तर  567 क्विंटल पांढरा सोयाबीन आला होता. लातूरमध्ये राज्यातील सर्वाधिक सोयाबीनची आवक झाली होती. गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये 23,395 क्विंटल, 13,595 क्विंटलए 15,904 क्विंटल अशी आवक होतेय.

महाराष्ट्रात सोयाबीनला काय मिळतोय भाव?

मंगळवारी ( दि4 फेब्रुवारी) रोजी तब्बल 41,049 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. बहुतांश ठिकाणी पिवळा सोयाबीन होता. काही भागात लोकल सोयाबीनचीही आवक झाली होती. राज्यात सोयाबीनला सर्वसाधारण 3900- 4100 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे.

लातूरमध्ये सोयाबीनला सर्वसाधारण  3975 रुपये प्रति क्विंटल रुपयांचा भाव मिळाला. तर सर्वाधिक भाव सोलापूर बाजारसमितीत लोकल सोयाबीनला मिळाल्याचे पणन विभागाने सांगितले. प्रति क्विंटल 4140 रुपये एवढा भाव होता.

सध्या सोयाबीनचा हमीभाव किती?

सोयाबीन हमीभावात लक्षणीय वाढ
नवीन हमीभाव: रु. 4892/- प्रति क्विंटल

मागील वर्षीच्या तुलनेत (रु. 4600/-) लक्षणीय वाढ

जाणून घ्या प्रमुख बाजारसमितींमधील आवक व मिळालेला भाव

महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव (04 फेब्रुवारी 2025)

जिल्हा आवक (क्विंटल) दर (रु./क्विंटल)
अहिल्यानगर 95 4000
अकोला 4975 4028
अमरावती 6685 3915
बीड 1227 3950
बुलढाणा 2962 3812
चंद्रपूर 221 3750
छत्रपती संभाजीनगर 38 3950
धाराशिव 499 3870
धुळे 35 3905
हिंगोली 1936 3886
जळगाव 365 3862
जालना 4296 4025
लातूर 2823 3975
नागपूर 1004 3943
नांदेड 63 4000
नंदुरबार 61 4041
नाशिक 1487 3924
परभणी 121 4050
पुणे 217 3990
सोलापूर 300 4140
वर्धा 4399 3810
वाशिम 6310 3875
यवतमाळ 930 3955

एकूण आवक: 41,049 क्विंटल

हेही वाचा:

आता सोयाबीन खरेदीवर प्रशासनाची करडी नजर; तपासणीसाठी पथके गठीत, मुदतवाढ दिल्यानंतर प्रशासन सतर्क