Solapur: सोलापूरच्या एका शेतकऱ्याला जोडधंद्यातून सध्या वार्षिक 20 लाख रुपये मिळतात. महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांप्रमाणेच सोलापूरचे शेतकरी अरुण शिंदे शेतीला जोड व्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्मिंग करतात. (Poultry Farm) राज्यातली प्रसिद्ध असणारी कडकनाथ सारखीच दिसणारी पण काळया रंगाची ऑस्ट्रेलियन कोंबड्यांची जात या शेतकऱ्याने पोल्ट्री फार्मिंगसाठी निवडली आहे. चिकन आणि अंड्यांसाठी प्रसिद्ध असणारी ही कोंबडी सोलापूरच्या शेतकऱ्याला चांगलाच नफा मिळवून देणारी ठरली आहे. या व्यवसायातून अरुण शिंदे गेल्या पाच वर्षांपासून लाखोंमध्ये कमाई करत आहेत. (Success Story)
ऑस्ट्रेलियन कोंबडींच्या जातीने दिलं आर्थिक बळ
राज्यात अनेक जण शेतीला जोडधंदा म्हणून डेअरी, पोल्ट्री असे व्यवसाय करताना दिसतात. अनेक जण सरधोपटपणे बाकीचे करतात तसाच व्यवसाय करायला पाहतात . सोलापूरच्या या शेतकऱ्याने सध्या बाजारात सर्वात अधिक किंमत कोणत्या कोंबडीला आहे? सर्वात चांगलं चिकन कोणत्या कोंबडीचं असतं यासाठी कोल्हापूर येथून फार्मिंगचे प्रशिक्षण घेतले .त्यानंतर ऑस्ट्रेलियन जातीची ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प प्रगत जात फायदेशीर असल्याचं त्यांच्या लक्षात आलं .मग हळूहळू मांस आणि अंडी उत्पादनासाठी कोंबड्यांची संख्या त्यांनी वाढवली .आता शिंदे यांच्याकडे ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प जातीच्या 200 मादी कोंबड्या आहेत .ज्या दररोज 160 ते 170 अंडी देतात .या कोंबडीचे चिकन 200 रुपये प्रति किलो दराने विकले जाते .या कोंबडीच्या एका अंड्याची किंमत 17 रुपये आहे .या व्यवसायातून शेतकऱ्याचे जोडधंद्यातून वार्षिक उत्पन्न 20 लाखांच्या घरात गेलाय .गेल्या पाच वर्षांपासून ते हा जोडधंदा करत आहेत .
प्रगत जात, किंमतही चांगली मिळतेय
तरुण उद्योजकने दिलेल्या वृत्तानुसार प्रोशक्ती ऍग्रो फार्म असे अरुण शिंदे या शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्म चे नाव आहे .सोलापूरच्या कामती खुर्द गावच्या शेतकऱ्याने कोंबडीची प्रगत जात मांस आणि अंडे उत्पादनासाठी फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले .सध्या बाजारपेठेत या कोंबड्यांचे चिकन तसेच अंडी सर्वाधिक किमतीत विकले जातात .अंड्याची मागणी खाण्यापेक्षा नवीन पिल्ले तयार करण्यासाठी अधिक आहे .ही कोंबडी अडीच ते तीन महिन्यात 1.25 किलोपर्यंत वाढते त्यामुळे या कोंबडीच्या चिकनला साधारण दोनशे रुपये प्रति किलो भाव मिळतो .
हेही वाचा:
1 वाटी आमरस आणि 1 मोदक खायला दीड कोटी खर्च केला, पण शेतकऱ्यांसाठी... राजू शेट्टींचा हल्लाबोल