एक्स्प्लोर

साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रचंड आक्रमक पाऊल उचलले आहे. ठिकठिखाणी आंदोलने सुरु आहेत.

Raju Shetti : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रचंड आक्रमक पाऊल उचलले आहे. काल राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन स्थगित केल्यानंतर, आज राजू शेट्टी यांनी आपला मोर्चा थेट सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे वळवला आहे. दिवसभरात त्यांनी अनेक प्रमुख साखर कारखान्यांना थेट धडक देत 'काटा बंद' आंदोलन पुकारले. ज्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात एकच खळबळ उडाली आहे. राजू शेट्टींच्या या आक्रमक पवित्र्यापुढे सर्वच कारखान्यांनी आपले कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी येडेमच्धिंद्र येथे क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याला अभिवादन करून या आंदोलनास सुरवात केली. 

साखरेचा हमीभाव वाढवत नाही, तोपर्यंत कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही

राजू शेट्टी यांनी आज सकाळपासूनच सांगली आणि सातारा जिल्ह्यातील मातब्बर साखर कारखान्यांना लक्ष्य केले. यामध्ये कराडचा कृष्णा कारखाना,कुंडलचा क्रांती कारखाना, वांगीचा सोनहिरा कारखाना,वाळव्याचा हुतात्मा कारखाना चिखलीचा विश्वास कारखाना या सर्व कारखान्यांच्या वजन काट्यावर 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांसह धडक मारली. जोपर्यंत केंद्र सरकार साखरेचा हमीभाव (MSP) वाढवत नाही, तोपर्यंत कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही आणि सर्व कारखाने बंद ठेवणार, असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

साखरेचा हमीभाव वाढला, तर या लढाईत शेतकऱ्यांपेक्षा जास्त फायदा खुद्द कारखानदारांचाच होणार

यावेळी कारखानदारांना आणि प्रशासनाला इशारा देताना राजू शेट्टी  म्हणाले, चालू वर्षी शेतकरी केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांविरोधात रस्त्यावरची आरपारची लढाई लढत आहे. साखरेचा हमीभाव वाढला, तर या लढाईत शेतकऱ्यांपेक्षा जास्त फायदा खुद्द कारखानदारांचाच होणार आहे. त्यामुळे सर्व कारखानदारांनी कोणत्याही राजकीय किंवा शासकीय दबावाला बळी न पडता या आंदोलनाला जाहीर सहकार्य करावे. जर कोणी कारखाने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, तर होणाऱ्या तीव्र नुकसानीची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वी कारखान्यांची असेल.

खरेचा हमीभाव वाढवणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले 

स्वाभिमानीच्या 'काटा बंद' आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन आधीच सतर्क झाले होते. सर्वच साखर कारखान्यांच्या परिसरात सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, शेतकऱ्यांचा वाढता संताप आणि राजू शेट्टी यांच्या आक्रमक भूमिकेपुढे पोलिसांचा फौजफाटा असूनही कारखाने बंद पाडण्यात 'स्वाभिमानी'ला पूर्ण यश आले आहे. केंद्र सरकार आता या शेतकरी आंदोलनापुढे नमते घेणार का आणि साखरेचा हमीभाव वाढवणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
AI डेटा सेंटरमध्ये सोलापुरातील नेत्यांचे मित्र भागीदार, रोहित पवारांचा गंभीर आरोप, तर जयकुमार गोरेंनी पाण्याचं नियोजन केलं नसल्याची टीका 
AI डेटा सेंटरमध्ये सोलापुरातील नेत्यांचे मित्र भागीदार, रोहित पवारांचा गंभीर आरोप, तर जयकुमार गोरेंनी पाण्याचं नियोजन केलं नसल्याची टीका 
साखरेचा दर 31 वरुन 42 रुपये करा, ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनची सरकारकडे मोठी मागणी, साखर पुन्हा महागणार का?  
साखरेचा दर 31 वरुन 42 रुपये करा, ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनची सरकारकडे मोठी मागणी, साखर पुन्हा महागणार का?  
Advertisement

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
गोकुळच्या संत्तासंघर्षावर जोरदार युक्तिवाद; सरकारची बाजू मांडणाऱ्या वकीलाच्या एका वाक्याने गेम पटलणार?, कोर्टात काय घडलं?
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
Embed widget