एक्स्प्लोर

सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल

Raju Shetti on Devendra Fadnavis : सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री अजून किती दिवस शेतकऱ्यांना गंडवणार आहेत अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे. 

Raju Shetti on Devendra Fadnavis :  महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार होता तो आता 2 लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे. तर प्रोत्साहनपर अनुदानासाठीची 2026-27 चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री अजून किती दिवस शेतकऱ्यांना गंडवणार आहेत अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं सांगितलं होतं असे राजू शेट्टी म्हणाले. मात्र, सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार असा सवाल शेट्टींना केला. नवीन लाभधारकांच्या यादीमुळं अतिशय नगन्य शेतकऱ्यांची भर पडणार आहे. द्राक्ष, डाळिंब आणि संत्रा शेतकऱ्यांबाबत निर्णय घेण्याची गरज होती. प्रवीण परदेशी नावाचा विद्वान व्यक्ती माहिती तयार करण्याचं काम करणार आहे. या सगळ्यांमध्ये केवळ वेळ काढूपणा करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. 

कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांचा दोन घोषणा

2008 मध्ये देशात कर्जमाफी झाली, त्यानंतर 2009 मध्ये कर्जमाफी करण्यात आली. त्यावेळी 2008 मध्ये ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यांना 2009 मध्ये वगळलं होतं. 2026-27 च्या कर्जाची परतफेड केली पाहिजे, अशी अट टाकली होती, ज्यांना प्रोत्साहनपर लाभ देतोय, त्यांनी कर्ज वेळेत भरलं पाहिजे अशी भूमिका त्यामागील होती, असं देवेंद्र फडणीस म्हणाले. सातत्यानं या संदर्भात अटी शर्थी आहेत, अशी मागणी होत होती. रणधीर सावरकरांच्या नेतृत्त्वात महायुतीचे आमदार भेटले आणि 50 हजारांची अट काढून टाका, अशी मागणी केली. मी त्यांना अट काडून टाकल्यानं 4-5 हजार कोटींचा बोजा येईल. पण शिस्तीचा भाग म्हणून ही अट आणली आहे, समजा एक लाखांपर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी फायदा न मिळणारे राहतात. सगळ्याचं मत होतं, 2 लाख शेतकरी का सोडता. मी आर्थिक शिस्त सांगत होते, ते लोक  मला व्यापक विचार केला पाहिजे होते, असं सांगत होते.

महात्मा फुले कर्जमाफीमधील योजनेतील जे लोक होते ज्यांना 50 हजारांपर्यंत कर्जमाफी म्हटलं होतं. त्यांना देखील 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल. 2026-27 चा कर्ज भरण्यासंदर्भातील नियम वगळण्यात येईल. 2026 ला किती लोकांनी भरले याची माहिती आहे. 95 टक्के लोकांनी पैसे भरले. त्या अगोदरच्या तीन पैकी दोन वर्षात ज्यांनी पैसे भरले ते आता पात्र होतील, पहिल्यांदा असा निर्णय झाला आहे, यापूर्वी असा निर्णय झालेला नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget