Potatoe Tree :  निसर्गाच्या किमया भन्नाट असतात. अशीच एक बातमी समोर आलीय. बटाटा हा जमिनीच्या खाली येणारं पिक. मात्र पुण्यातल्या (pune) आंबेगावात बटाटा चक्क झाडावर लागल्याचं (Potato) समोर आलं आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात हा चमत्कार घडला आहे. या बटाट्यांची सध्या पंचक्रोशीत चांगलीच चर्चा सुरु आहे. संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात चक्क एका झाडाला लहान मोठे 17- 18 बटाटे लागले आहेत. त्याच्या शेतातील झाडाला लागलेले बटाटे पाहण्यासाठी सध्या चांगलीच गर्दी होत आहे.  झाडाला लागलेले बटाटे गावात कुतूहलाचा विषय बनला आहे.


आंबेगाव येथील शेतकरी संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील यांची निरगुडसर जवळच असलेल्या गण्या डोंगराच्या जवळ साडेतीन एकर क्षेत्र जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी बटाटा लागवड केली आहे. सध्या पीक काढणीला असल्याने पिकाचा पाला कापणी सुरू असताना एका झाडाला चक्क बटाटे आढळून आले आहेत. हे बटाटे पाहून दोघेही आश्चर्यचकीत झाले होते. गावात सगळ्यांना कळताच बटाटे पाहण्यासाठी गावकरी करत आहे. मागील अनेक वर्ष झाले ते बटाट्याची लागवड करत आहेत. एवढे दिवस बटाटे लागवड करत आसताना आतापर्यंत अशी गोष्ट पहायला मिळाली नाही. मात्र यंदाच्या वर्षी बटाटे चक्क झाडाला लागले असल्याने त्यांना आश्चर्य वाटलं आहे.


आंबेगावात मोठ्या प्रमाणात बटाट्याची लागवड
पुणे जिल्ह्यातील  आंबेगाव तालुक्यात बटाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दरवर्षी शेतकरी या हंगामात बटाटे काढणीला सुरुवात करतात. अनेक शेतकऱ्यांची बटाटा उत्पादनातून मोठी कमाई होते. मात्र या वर्षी बटाट्याची किंमत, बटाट्याची क्वॉलिटी याची चर्चा नाही तर झाडाला लागलेल्या बटाट्याची चर्चा होत आहे. 


पुखराज जातीचा बटाटा


संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील हे गावातील प्रयोगशील शेतकरी आहेत. शेतात अनेक प्रयोग करत असतात. त्यांनी 90 दिवसांपूर्वी पुखराज जातीच्या बटाट्याची लागवड केली होती. दोघेही तरुण शेतकरी असल्याने शेतात नवे यंत्र वापरण्याच्या प्रयत्नात ते असतात. मात्र यंदा चक्क झाडाला लागलेल्या बटाट्यामुळे दोघेही गावात प्रसिद्ध झाले आहेत. हा कोणताही प्रयोग नसून निसर्गाचा चमत्कार असल्याचं ते गावकऱ्यांना सांगत आहे. आतापर्यंत आजूबाजूच्या गावातील अनेकांनी हे बटाटे पाहण्यासाठी हजेरी लावली आहे. त्याचे हे बटाटे फक्त जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात भाव खाऊन जात आहे. येत्या काळात झाडालाही बटाटा लागू शकतो, असं गावकऱ्यांकडून मिश्किल भाषेत बोललं जात आहे.