PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात  सहा हजार रुपये जमा केले जातात. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हप्ते जमा झाले आहेत. 13 वा हप्ता कधी मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. मागील 12 हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा झाला होता. त्यामुळं नवीन वर्षात 13 वा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेशी देशातील आठ कोटीहून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत. सध्या पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची पडताळणी सुरू आहे. देशातील सर्वात मोठ्या योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील अल्पभूधारकर शेतकऱ्यांना दरवर्षी टप्प्याटप्यानं आर्थिक लाभ दिला जातो. चार महिन्यांच्या अंतारने शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात.


अनेक शेतकऱ्यांना 11 वा आणि 12वा हप्ता मिळालाच नाही कारण...


दरम्यान, PM Kisan सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. कारण हजारो शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.  ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना 11 वा आणि 12वा हप्ता मिळालेला नाही. जवळपास 1 कोटी 86 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. जर शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले तर पडताळणी होऊन उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल, अशी माहिती सरकारनं दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता नवीन वर्षात कधी मिळणार अशी चर्चा सुरु आहे. परंतू, नियमानुसार, दर तीन ते चार महिन्यांनी, 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केला जातो. त्यानुसार 13 वा हप्ता हा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळण्याची शक्यता आहे.


 17 ऑक्टोबर 2022 ला 12 वा हप्ता मिळाला होता


17 ऑक्टोबर 2022 ला 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती. हा शेतकऱ्यांना मिळालेला 12 वा हप्ता होता. आता 13 वा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


PM Kisan Scheme : तब्बल 4 कोटी 50 लाख शेतकऱ्यांना PM किसानचा 12 वा हप्ता मिळालाच नाही, कागदपत्रांची पूर्तता करण्याचं आवाहन