PM Kisan Samman Nidhi : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात जमा झाले आहेत. सध्या शेतकरी 13 वा हप्ता कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. दरम्यान, देशातील 4 कोटी 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 वा हप्ता जमा झाला नाही. ज्या शेतकऱ्यांकडे ई-केवायसी (eKYC) तसेच इतर कागदपत्रांची पूर्तता केली नाही किंवा कागदपत्रे ऑनलाइन अपडेट केली नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही.
10 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ
केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन्मान निधीच्या रूपाने शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी मदत पोहोचत आहे. प्रधानमंत्री सन्मान निधी अंतर्गत मिळणारी रक्कम दैनंदिन वापरासाठी वापरली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हप्ते घेत आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही 10 कोटींहून अधिक असल्याची माहिती केंद्र सरकारचा आकडेवारीवरुन समोर आली आहे. 2018 मध्ये जेव्हा PM किसान योजना सुरू करण्यात आली, तेव्हा केवळ 3.16 कोटी शेतकरी या योजनेशी जोडले गेले होते. आता हा आकडा तिपटीने वाढला आहे.
कधी जमा होणार 13 वा हप्ता
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात जमा झाले आहेत. लवकरच 13 व्या हप्त्याची मदत देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. नवीन वर्षात ही आर्थिक मदत कधी मिळणार? याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी त्याआधीच आपली eKYC तसेच रेशन कार्डहीत आपली सर्व कागदपत्रे अपडेट करावीत असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी, 17 ऑक्टोबर 2022 रोजी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती. आता 13 वा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता डिसेंबर 2022 ते मार्च 2023 दरम्यान हस्तांतरित केला जाणार आहे. दरवर्षी चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये वर्ग केले जातात. आता पुढच्या 13 व्या हप्त्याचे पैसे 17 फेब्रुवारीपर्यंत हस्तांतरित केले जाऊ शकतात.
हप्ता मिळवण्यासाठी काय कराल?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत ई-केवायसी करावी लागणार आहे. तसे केंद्र सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत. आधार कार्ड अपडेट करावे लागेल, तसेच जमीन पडताळणी, शिधापत्रिकेची प्रत सादर करावी लागेल. जे शेतकरी हे करणार नाहीत, त्याला निधीचा लाभ मिळणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या: