PM Kisan Samman Nidhi Yojana :  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना 20 हप्त्यांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21  वा हप्ता कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सरकारने अलीकडेच हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड सारख्या पूर आणि पावसाने प्रभावित राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी 21 वा हप्ता जारी केला आहे.

Continues below advertisement

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता जारी केला आहे. या राज्यांमध्ये अलिकडेच झालेल्या पूर आणि भूस्खलनामुळे ही रक्कम आगाऊ जारी करण्यात आली. त्यानंतर, 7 ऑक्टोबर 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांसाठी 21वा हप्ता जारी करण्यात आला आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना काय आहे?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची मदत मिळते, जी थेट त्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी 2000 रुपये) हस्तांतरित केली जाते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या खर्चात आणि कापणी दरम्यानच्या उत्पन्नात मदत करण्यासाठी ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) द्वारे वितरित केली जाते. आत्तापर्यंत देशातील शेतखऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे 20 हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. 20 वा पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांना ऑगस्ट 2025 मध्ये जारी करण्यात आला होता. त्यानंतर या महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातील पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 21 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

21 वा हप्ता ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये अपेक्षित

20 वा हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये जारी करण्यात आला, जो 85 दशलक्षाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित करण्यात आला. पुढील हप्ता ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये अपेक्षित आहे. सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा हप्ता दिवाळी 2025 पूर्वी जारी केला जाऊ शकतो असे मानले जाते.

पीएम किसान ई-केवायसी अनिवार्य

पीएम किसान ई-केवायसी अनिवार्य आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ईकेवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. ओटीपी-आधारित ईकेवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे. शेतकरी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये बायोमेट्रिक-आधारित eKYC देखील पूर्ण करू शकतात.