Konkan Rain : आत्तापर्यंत राज्यात चांगला पाऊस (Rain) झाला आहे. काही ठिकाणी मात्र, अतिवृष्टी झाली आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दुसरीकडं हा पाऊस कोकणातील (Konkan) शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरला आहे. कोकणात यावर्षी मोठ्या प्रमाणावर भाताची (Rice) आणि नाचणीची (Nachani) लागवड झाली आहे. कोकणात जवळपास 90 टक्के क्षेत्रावर भात आणि नाचणीची लावणी पूर्ण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही नाचणी आणि भाताच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. 


रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 56 हजार हेक्टरवर भात लावणी पूर्ण


दरम्यान, गेल्या पंधरा दिवसापासून कोकणात पावसानं उसंत घेतली आहे. सध्या बरसणारा पाऊस हा हलका ते मध्यम स्वरुपाचा अधून मधून बरसत आहे. दरम्यान आता शेतीची काम देखील अंतिम टप्प्यात आली आहेत. कोकणात जवळपास 90 टक्के क्षेत्रावर भात आणि नाचणीच्या लाववडी पूर्ण झाली आहेत. यंदा भात आणि नाचणीच्या लावणी क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 56 हजार हेक्टरवर भात लावणी पूर्ण झाली आहे. यावर्षी 70 हजार हेक्टरवर भात लावणी तर पंधरा हजार हेक्टरवर नाचणीच्या लावणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सध्या कोकणातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा खेळ सुरु आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत 2900 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. तर यंदा मात्र 1888 मिलिमीटरची सरासरी पावसानं गाठली आहे. 


मागच्या वर्षीपेक्षा यंदा आत्तापर्यंत कोकणात कमी पाऊस


हवामान विभागानं कोकण असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. पण एकंदर स्थिती पाहता, गेल्या वर्षीच्या पावसाची तुलना करता यंदा मात्र पाऊस कमी झाला आहे. तसेच कुठेही मोठ्या प्रमाणात पूरस्थिती किंवा हानी झाल्याची नोंद नाही. पण कदाचित ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाचा हा जोर पाहायला मिळेल अशी स्थिती वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मात्र, चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथील पिकांना मात्र, या पावसाचा मोठा फटका बसला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: