Lasalgaon Bajar Samiti लासलगाव : राज्यात कांद्याला  (Onion Price) सध्या कवडीमोल भाव मिळत असल्याने सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कांद्याला हमीभाव मिळावा, राज्य सरकारने तातडीने कांद्याला किमान 2 ते 3 हजार हमीभाव द्यावा, तसेच प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे. यासह शेतकऱ्यांच्या न्यायिक मागण्या व हक्कासाठी आज ( दि.18 मे ) सकाळी 9 वाजता लासलगाव बाजार समितीत  (Lasalgaon Bajar Samiti) ' शेतकरी एल्गार ' आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे (शरद पवार गट ) आमदार रोहित पवार (Rohit Pawar), खासदार भास्कर भगरे (Bhaskar Bhagre) व तमाम कांदा उत्पादक शेतकरी करणार आहे. या आंदोलनात कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळेराज्यातपुन्हाएकदाकांद्याचाप्रश्न तापण्याचीशक्यताआहे. (Onion Prices Crash Maharashtra)

Continues below advertisement

शेतकऱ्यांच्यानेमक्यामागण्याकाय? (Onion Farmers) 

- कांद्याच्या दरात होणारी सातत्याने घसरण...

Continues below advertisement

- शासनाने दिलेले 1235 रुपये भावाबद्दल शेतकरी समाधानी नाही..

- निर्यात खुली, मात्र कांदा बांगलादेशमध्ये जात नाही..

- श्रीलंकेत इम्पोर्ट टॅक्स लावल्याने श्रीलंकेत कांदा जात नाही...

- आखाती देशात युद्धाचा परिणाम असल्याने भाववाढ झालेली आहे, सहापट भाववाढ झाल्याने एक्सपोर्ट परवडत नाही..

- श्रीलंका इम्पोर्ट टॅक्स कमी झाला पाहिजे किंवा एक्सपोर्टला सबसिडी द्यावी...

- आखाती देशातील युद्ध, निर्यात बंदी आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचा खर्चही निघत नाही..

- या सर्व मागण्यांवर आज आ.रोहित पवार, खा.भास्कर भगरे व कांदा उत्पादक शेतकरी यांच्या वतीने लासलगाव बाजार समितीमध्ये एल्गार आंदोलन..

- मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार.

Onion Price Crisis: राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल

राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आखाती देशातील युद्ध, निर्यात बंदी आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचा खर्चही (Onion Price Crisis) निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आज प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने कांद्याला किमान 2 ते 3 हजार हमीभाव द्यावा तसेच प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे. नाफेडमार्फत कांदा खरेदी (Onion Price) सुरू करावी. केंद्र सरकारशी समन्वय साधून दीर्घकालीन स्थिर निर्यात धोरण लागू करावे अशा अनेक मागण्याशेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. 

Radhakrishna Vikhe Patil : कांद्याचे दर कोसळले हे चिंतेची बाब, सरकार नक्कीच विचार करेल

राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, यावर मंत्री राधाकृष्ण विखेंनी सांगितलं की आखाती देशात युद्ध असतांना देखील सरकारने कुठलीही निर्यात बंदी ठेवलेली नाही. मात्र जगाच संपूर्ण अर्थकारण एका हॉर्मोसवर थांबलेल आहे. आज मुंबई बंदरामध्ये किती शेतीमाल पडून आहे. आज कांद्याचे दर कोसळले हे चिंतेची बाब आहे, या संदर्भात सरकार नक्कीच विचार करेल. परंतु आज निर्यात बंदी नसताना ही आखाती देशात उद्भवलेल्या परिस्थितीला आपल्या सगळ्यांना सामोरें जावे लागेल, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.