Dhananjay Munde : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) आणि  राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून (Namo shetkari maha samman nidhi yojana) राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नसल्याचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी केलं. यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील आहे. धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात याबाबत माहिती दिली. 


पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे 96 लाख शेतकरी पात्र


पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसारच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. मात्र, ई केवायसी पूर्ण नसणे, बँक खाते आधार शी संलग्न करणे, अशा काही अटींची पूर्तता न होऊ शकल्याने यांपैकी 12 ते 13 लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हफत्याच्या वितरणानंतर ही बाब लक्षात आल्याने, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कृषी, महसूल व भूमिअभिलेख आदी विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवत आतापर्यंत सुमारे 6 लाख शेतकऱ्यांच्या वरील अटींची पूर्तता करण्यात आली आहे.


नाना पटोले, आणि बाळासाहेब थोरातांचा प्रश्न


जे शेतकरी अल्प भूधारक  किंवा अन्य कारणांनी लाभार्थी ठरत नाहीत, त्यांचे नाव योजनेतून कमी करण्याची देखील कार्यवाही केली जात आहे. मात्र, या कार्यवाहीचा परिणाम एकाही पात्र लाभार्थ्यांवर होऊ देणार नाही, अशी खात्री धनंजय मुंडे यांनी दिली. या विषयावर आमदार नाना पटोले, आमदार बाळासाहेब थोरात आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे बोलत होते.


महत्त्वाच्या बातम्या:


भाजपशासित राज्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार? बाकीच्या राज्यांमध्ये काय होणार?