एक्स्प्लोर

नाफेडकडून कांदा खरेदीच्या दरात वाढ, मात्र, बाजार समितीत कांदा दरात घसरण, शेतकऱ्यांना फटका 

एका बाजूला सरकारने नाफेडच्या कांदा खरेदीचे दर वाढले असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र बाजार समितीत कांदा दरात घसरण सुरुच आहे.

Nashik, Onion News :  कांदा उत्पादक सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. कांदा खरेदीच्या दरात वाढ केली आहे. 16.50 रुपये प्रति किलो दरानं कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, एका बाजूला सरकारने नाफेडच्या कांदा खरेदीचे दर वाढले असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र बाजार समितीत कांदा दरात घसरण सुरुच आहे. नाशिकच्या लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात 8 दिवसात 2 ते 3 प्रतिकिलो रुपयांची घसरण झाली आहे. 

लासलगावच्या बाजार समितीत सरासरी भाव 1500 वरुन आज 1451 प्रतिक्विंटलवर

केंद्र सरकारने नाफेडचे दर प्रतिक्विंटल 70 रुपयांनी वाढवले आहेत. 1580 रुपये प्रतिक्विंटलवरुन सरकारने कांद्याचे दर हे 1650 रुपये केले आहेत. मात्र प्रत्यक्ष लिलावात आता कांदा दर घसरलेत. काल लासलगावच्या बाजार समितीत सरासरी भाव 1500 वरुन आज 1451 प्रतिक्विंटल वर आला आहे. तर जास्तीत जास्त भाव प्रतिक्विंटल 2107 वरून 1851 वर आला आहे. कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. नाफेड लिलावात न उतरल्याने भावात घसरण व्हायला सुरुवात झाली आहे. 

वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता 30 रुपये प्रति किलो खरेदी दराची मागणी 

देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी, लागवडीचा वाढलेला खर्च लक्षात घेता 30 रुपये प्रति किलो खरेदी दराची मागणी केली आहे. बाजारातील चढ-उतार नियंत्रित करण्यासाठी (मार्केट इंटरव्हेंशन) 'किंमत स्थिरीकरण निधी' (PSF) अंतर्गत दरवर्षी हा राखीव साठा (बफर स्टॉक) तयार केला जातो. सरकारने या वर्षासाठी 2 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे; हे प्रमाण मागील वर्षीच्या (2025-26) 3 लाख टन खरेदीच्या तुलनेत कमी आहे. 

कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना फटका

राज्यात कांद्याला  (Onion Price) सध्या कवडीमोल भाव मिळत असल्याने सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कांद्याला हमीभाव मिळावा, राज्य सरकारने तातडीने कांद्याला किमान 2 ते 3 हजार हमीभाव द्यावा, तसेच प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे. यासह शेतकऱ्यांच्या न्यायिक मागण्या व हक्कासाठी विविध ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली होती. विरोधकांनी कांद्याच्या मुद्यावरुन चांगलचे रान उठवले होते. शेतकऱ्यांचा विरोध झाल्यानंतर सरकारनं कांद्याचा दर प्रति किलो 15.80  रुपये केला होता. त्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विरोधक केला होता. उत्पादन खऱ्च वाढला आहे. त्यामुळं सरकारनं कांद्याच्या दरात वाढ करावी असी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. अशातच सरकारनं आता कांदा खरेदीच्या दराव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं आता 16.50 रुपये प्रति किलो दरानं कांद्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारकडून नेहमीच धरसोडीचे धोरण अवलंबले जात आहे. याचा परिणाम देशाच्या परकीय चलणावर होत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसतो. त्याचबरोबर कांद्याच्या दरात वाढ झाली की, निर्यातबंदी देखील केली जाते. यामुळं कांद्याची आवक वाढून दरात मोठी घसरण होते, याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Bogus Seeds News : राज्यभरात बोगस खत ,अन् निकृष्ठ बियाणांचा सुळसुळाट; आता फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, नेमकं काय होणार?
राज्यभरात बोगस खत ,अन् निकृष्ठ बियाणांचा सुळसुळाट; आता फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, नेमकं काय होणार?
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 24 वा हप्ता मिळवण्यासाठी 'हे' काम करा, अन्यथा लाभापासून राहाल वंचित 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 24 वा हप्ता मिळवण्यासाठी 'हे' काम करा, अन्यथा लाभापासून राहाल वंचित 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget