Nashik Onion News : नाशिकच्या उमराणे (Umrane in Nashik)  येथील एन.सी.सी.एफ.कांदा खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातून आणलेला 20 ते 25  ट्रक हलक्या प्रतीचा कांदा खाली होत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. आणलेल्या ट्रक अडवून धरल्या आहेत. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा जमाव या गोडाऊन जवळ जमा झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Continues below advertisement

मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीचा कांदा या ठिकाणी उतरण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप 

गोडाऊनमध्ये दोन संस्थाचा कांदा साठविला जातो. मात्र या ठिकाणी मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीचा कांदा या ठिकाणी उतरण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. एन.सी.सी.एफ व नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करताना जाचक नियम व अटी लावून चांगल्या प्रतीचा कांदाही नाकारण्यात आला. तर दुसरीकडे नाफेड एन. सी.सी.एफ ने सहा वेळा दर वाढ करून कांदा उत्पादक शेतकरी खरेदी केंद्राकडे फिरकले नसताना एकाच वेळी 20 ते 25 ट्रक कांदा कसा काय या गोडाऊन खाली करण्यासाठी आला. यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडले जात असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला असून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेले आरोप मात्र संस्थांनी फेटाळला आहे.

नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) मार्फत कांदा खरेदी केंद्र सुरू

नाशिक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेरंतर्गत नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) मार्फत कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. लासलगाव, देवळा आणि उमराणेसह जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ही खरेदी केंद्र आहेत.

Continues below advertisement

केंद्र सरकारने नाफेड व एन.सी.सी.एफ मार्फत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवलंय

भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत केंद्र सरकारने नाफेड व एन.सी.सी.एफ मार्फत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट 30 जूनपर्यंत ठरवले होते. मात्र शेतकऱ्यांनी कांदा खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याने दोन महिने उलटूनही हे उद्दिष्ट्य पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत केवळ 36  हजार मेट्रिक टन कांदा खरेदी झाली आहे..त्यामुळे दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट अधांतरीच राहिले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Onion Price Drop: केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?