एक्स्प्लोर

मराठवाड्यात कुठे किती चारा शिल्लक? कुठे 175 दिवसांचा, तर कुठे फक्त 76 दिवसांचा साठा! किती पंचनामे पूर्ण? वाचा सविस्तर

दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात पंचनाम्यानची प्रक्रिया सुरू आहे.

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात यावर्षी भीषण दुष्काळाला शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक सामोरे जात आहे. पावसाअभावी हाताततोंडाशी आलेलं पीक करपून गेलं. मैलोन मैल वाळलेली शेती दिसू लागली आहे. नद्या आटू लागल्या आहेत. जलस्त्रोत कोरडे पडू लागले आहेत. विहिरी आणि शेततळ्यांनी तळ गाठला असताना शेतकऱ्यांसमोर जनावराला जगवायचं कसं असा प्रश्न उभा राहिला आहे. मराठवाड्यात पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भीषण होत चाललाय. 28 सप्टेंबर 2026  रोजीच्या कृषी पंचनामा अहवालानुसार, मराठवाड्यात एकूण 31 लाख 22 हजार 256 मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे.जिल्हानिहाय उपलब्ध चाऱ्याचा साठा सुमारे 76 ते 179 दिवस पुरेल, अशी नोंद या अहवालात करण्यात आली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये चाऱ्याचा साठा तुलनेने समाधानकारक असला, तरी काही ठिकाणी पुढील काळातील चाऱ्याच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. (Marathwada Drought)

दरम्यान दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात पंचनाम्यानची प्रक्रिया सुरू आहे. 3 ऑक्टोबर 2026 रोजी पूर्ण झालेल्या पंचनाम्यानच्या अहवालानुसार मराठवाड्यात एकूण 8823 बाधित गावांपैकी आतापर्यंत 3586 गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. म्हणजेच एकूण बाधित गावांपैकी 43.56% गावांमध्ये पंचनामाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

वाचा जिल्हानिहाय चारा साठा 

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक नसला तरी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध आहे. जिल्ह्यात 6 लाख 3 हजार 92 मेट्रिक टन चारा शिल्लक असून हा साठा सुमारे 175 दिवस पुरेल, अशी नोंद आहे.
  • जालना जिल्ह्यात 2 लाख 49 हजार 96 मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. मात्र जिल्हानिहाय पाहता हा साठा सर्वात कमी कालावधीसाठी पुरणार आहे. जालन्यातील उपलब्ध चारा सुमारे 76 दिवस पुरेल, अशी माहिती अहवालात आहे.
  • परभणी जिल्ह्यात 2 लाख 29 हजार 163 मेट्रिक टन चारा उपलब्ध असून तो सुमारे 101 दिवस पुरेल. बीड जिल्ह्यात 3 लाख 37 हजार 758 मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे.
  • बीडमधील हा साठा सुमारे 87 दिवस पुरेल.
  • नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यातील सर्वाधिक चारा उपलब्ध असल्याचं आकडेवारीतून दिसतं. नांदेडमध्ये तब्बल 8 लाख 4 हजार 168 मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. हा साठा सुमारे 174 दिवस पुरेल.
  • हिंगोली जिल्ह्यात 2 लाख 44 हजार 366 मेट्रिक टन चारा उपलब्ध असून तो सुमारे 138 दिवस पुरेल.
  • लातूरमध्ये 2 लाख 53 हजार 477 मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. लातूरमधील उपलब्ध चारा सुमारे 110 दिवस पुरेल.
  • धाराशिव जिल्ह्यात 4 लाख 39 हजार 520 मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. जिल्हानिहाय उपलब्धतेच्या कालावधीचा विचार करता धाराशिवमध्ये सर्वाधिक 179 दिवसांचा चारा साठा उपलब्ध असल्याचं अहवालातून समोर आलं आहे.

चारा व्यवस्थापनाचं मोठं आव्हान

अहवालातील आकडेवारीनुसार, मराठवाड्यात सध्या एकूण 31 लाख 22 हजार 256 मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. मात्र जिल्हानिहाय उपलब्धतेमध्ये मोठी तफावत आहे. धाराशिवमध्ये हा साठा 179 दिवस पुरेल, तर जालना जिल्ह्यात उपलब्ध चारा केवळ 76 दिवस पुरेल, अशी नोंद आहे. त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याच्या उपलब्धतेवरही लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेषतः कमी दिवसांचा साठा असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील काळात चारा व्यवस्थापनाचं आव्हान निर्माण होण्याची शक्यता या आकडेवारीतून दिसून येते.

8,233 बाधित गावांपैकी 43.56 टक्के पंचनामे पूर्ण

3 ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्यातील एकूण 8,233 बाधित गावांपैकी 3,586 गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यानुसार पंचनामे पूर्ण झालेल्या गावांची टक्केवारी 43.56 टक्के आहे.जिल्हानिहाय पाहता बीडमध्ये 512, परभणीत 602, लातूरमध्ये 510, जालन्यात 500, छत्रपती संभाजीनगरमध्ये 435, धाराशिवमध्ये 422, हिंगोलीत 379 आणि नांदेडमध्ये 226 गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत आणि नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे उर्वरित बाधित गावांमध्ये पंचनामे कधी पूर्ण होतात आणि त्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळते, याकडे आता लक्ष लागलं आहे.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूरनंतर आता सोलापूर जिल्ह्यातही वार फिरलं! ऊस दरासाठी राजू शेट्टी मैदानात, 1 लाख शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार
कोल्हापूरनंतर आता सोलापूर जिल्ह्यातही वार फिरलं! ऊस दरासाठी राजू शेट्टी मैदानात, 1 लाख शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार
तुम्ही ई-पीक पाहणी केलीय का? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला मोठा निर्णय 
तुम्ही ई-पीक पाहणी केलीय का? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला मोठा निर्णय 
सरकारच्या नरडीवर पाय ठेवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ, मागण्या मान्य न झाल्यास नागपूर अधिवेशन कसं होतं ते पाहू, रविकांत तुपकरांचा इशारा
सरकारच्या नरडीवर पाय ठेवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ, मागण्या मान्य न झाल्यास नागपूर अधिवेशन कसं होतं ते पाहू, रविकांत तुपकरांचा इशारा
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: 'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
IndiGo Flight : पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानंतर '6E 0623' विमानाचे सुरक्षित लँडिंग, 192 जण सुखरूप, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानंतर '6E 0623' विमानाचे सुरक्षित लँडिंग, 192 जण सुखरूप, नेमकं काय घडलं?
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Bhandara News: लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
BMC News: महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Embed widget