Maharashtra Weather Rain News : राज्यातील वातावरणात मोठा बदलझाला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. अशातच आज राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. तळकोकणात सह्याद्री पट्ट्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला आहे. तळकोकणासह परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.  

Continues below advertisement

तळकोकणात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

तळकोकणात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. अवकाळी पावसामुळं  उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

परभणीत हवामानात अचानक बदल, जोरदार वाऱ्यासह रिमझिम पावसाची हजेरी

उकाड्यानंतर परभणीत हवामानात अचानक बदल झाला आहे. जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार वाऱ्यासह रिमझिम पावसाची हजेरी सुरु झाली आहे. दिवसभर अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यानंतर परभणी जिल्ह्यात दुपारच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला आहे. अचानकपणे शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.अचानक वेगाने सुटलेल्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी छोटे मोठे वृक्ष पडले तसेच बॅनर, होर्डिंग्ज आणि जाहिरात फलक कोसळल्याच्या घटना घडल्या. काही भागांत धुळीचे लोट उठल्याने वाहनचालकांचीही तारांबळ उडाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Continues below advertisement

पुढील काही तासांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता

परभणी जिल्ह्यातील अनेक भागांत आकाश ढगाळ झाले असून पुढील काही तासांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या वादळी वाऱ्यासह पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा अंदाज व्यक्त केला असून येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सकाळपासून जिल्ह्यात दमट आणि ढगाळ वातावरण आहे. काल जिल्हातील सर्वच भागात अवकाळी पाऊस कोसळला. काही ठिकाणी आंबा, काजूच्या फांद्या तुटून पडल्या. मात्र आज देखील अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज असल्याने प्रशासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या धान्यांची योग्य प्रकारे साठवण करून ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

EL Nino : जगावर 'महा-एल निनो'चं संकट! 150 वर्षांपूर्वी जे घडलं त्याचीच यंदा पुनरावृत्ती होणार; ECMWF वेधशाळेनं वर्तवला भयावह अंदाज, भारतावरही परिणाम?