जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात किती झाला पाऊस? 'या' 15 जिल्ह्यांना मोठा फटका, तुमचा जिल्हा कोणता?
सध्या राज्यात पावसानं (Rain) दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. शेतकरी पावसाची मोठ्या आशेनं वाट पाहत आहेत.

Maharashtra Rain Update news : सध्या राज्यात पावसानं (Rain) दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. शेतकरी पावसाची मोठ्या आशेनं वाट पाहत आहेत. दरम्यान, जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात राज्यात किती पाऊस झाला आहे? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? तर राज्यात पावसाची 14.7 टक्के तूट आहे. तर 15 जिल्ह्यांत 75 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यासह विदर्भा पश्चिम महाराष्ट्रात पिके करपू लागली आहेत. अनेक ठिकाणी पावसाचा मोठा खंड आहे.
1 जून ते 31 ऑगस्टदरम्यान अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल 14.7 टक्के पावसाची तूट
राज्यात 1 जून ते 31 ऑगस्टदरम्यान अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल 14.7 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या खरीप पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरु होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीदेखील राज्यात समाधानकारख पाऊस पडलेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वायाच चालली आहेत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा देखील मोठी प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात किती पाऊस झाला?
▪️ अपेक्षित सरासरी पाऊस : 824.5 मिमी
▪️ प्रत्यक्ष झालेला पाऊस : 703.4 मिमी
▪️ सरासरीच्या तुलनेत : 85.31 टक्के
▪️ पावसाची तूट : 14.7 टक्के
म्हणजेच राज्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत मोठी कमतरता राहिली आहे.
या १५ जिल्ह्यांत 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस
सोलापूर
कोल्हापूर
बीड
लातूर
धाराशिव
परभणी
अकोला
वाशिम
अमरावती
वर्धा
नागपूर
भंडारा
चंद्रपूर
नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी केवळ 47.48 टक्के पाऊस झाला आहे.
मराठवाड्यात परिस्थिती चिंताजनक
छत्रपती संभाजीनगर विभागात सरासरी 793.9 मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात 382.9 मिमी पाऊस झाला आहे. पावसाचा मोठा खंड पडल्याने अनेक भागांमध्ये खरीप पिकांवर पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. आठवडाभर पाऊस न झाल्यास काही भागातील पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
विभागनिहाय पावसाची स्थिती
कोकण विभाग
सरासरी : 2482.6 मिमी
प्रत्यक्ष : 2405.1 मिमी
पाऊस : 96.84 टक्के
नाशिक विभाग
सरासरी : 555.6 मिमी
प्रत्यक्ष : 412.5 मिमी
पाऊस : 74.24 टक्के
पुणे विभाग
सरासरी : 773.3 मिमी
प्रत्यक्ष : 568.8 मिमी
पाऊस : 73.53 टक्के
अमरावती विभाग
सरासरी : 618.9 मिमी
प्रत्यक्ष : 449.3 मिमी
पाऊस : 78.29 टक्के
नागपूर विभाग
सरासरी : 897.2 मिमी
प्रत्यक्ष : 650.09 मिमी
पाऊस : 72.55 टक्के
काही जिल्ह्यांत पाऊस समाधानकारक
पालघर, ठाणे आणि पुणे जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली येथे सरासरीच्या आसपास पाऊस नोंदवण्यात आला आहे.





















