Kisan Sabha long March: किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं सुरु असलेल्या लाँग मार्चची (long March) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दखल घेतली आहे. आज दुपारी एक वाजता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यासह कामगार मंत्री सुरेश खाडे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार आहे. या भेटीत आंदोलकांच्या मागण्यांसदर्भात चर्चा होणार आहे.
मंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची दिशा ठरणार
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लाँग मार्च निघाला आहे. या लाँग मार्चचा आज दुसरा दिवस आहे. अकोले ते लोणी असा 55 किलोमीटरचा हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चची आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आहे. आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आंदोलकांची भेट घेणार आहेत. यामध्ये मागण्यांसदर्भात चर्चा होणार आहे. या भेटीनंतर आंदोलकांची पुढची दिशा ठरणार आहे. मंत्र्यांसोबतच्या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही तर लाँग मार्च सुरुच राहणार असल्याची माहिती डॉ. अजित नवलेंनी दिली आहे.
र्चा यशस्वी झाली तर मोर्चा स्थगित करु अन्यथा...
दरम्यान, संगमनेर प्रांत कार्यलयात मंत्री आणि आंदोलकांची बैठक होणार आहे. त्याआधी मोर्चाच्या शिष्टमंडळाची औपचारिक बैठक होणार आहे. सरकार समोर कोणते मुद्दे मांडायचे त्यासंदर्भात यामध्ये निर्णय होणार आहे. किसान सभेकडून अशोक ढवळे, डॉ. अजित नवले यांच्यासह किसान सभेचे इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. वन जमीन, मजुरांचे प्रश्न, आदिवासीचे प्रश्न, कांदा हमीभाव आशा वेगवेगळ्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मागील मोर्चातील काही मागण्या मान्य मात्र उर्वरित मागण्या अद्याप ही प्रलंबित आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. जोपर्यंत चर्चा होणार नाही तोपर्यंत काल रात्री जिथे मुक्काम होता तिथेच थांबणार असल्याची माहिती अजित नवलेंनी दिली आहे. चर्चा यशस्वी झाली तर मोर्चा स्थगित करु अन्यथा दुपारनंतर पुन्हा पायी मोर्चा सुरू होणार असल्याचं अजित नवलेंनी सांगितलं.
Ajit Nawale : चर्चेची दारं आम्ही कधीच बंद केली नाहीत
चर्चेची दारं आम्ही कधीच बंद केली नाहीत. मागच्या बैठकीत ज्या मागण्या आम्ही केल्या त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. त्याबद्दल बोला असे नवले म्हणाले. आंदोलन आम्ही मागे घेतलेलं नाही. मागण्यासंदर्भात योग्य निर्णय नाही घेतला तर पुढे चालत राहणार असल्याचे नवलेंनी सांगितलं. आमच्यात लवचिकता आहे. मंत्री येत आहेत. आम्ही देखील आहे तिथे थांबत आहोत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय ठरवू असे नवले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: