Jalgaon Banana News : सध्या राज्यात परतीच्या पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडं पावसाचं संकट असताना दुसरीकडं जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील केळी (Banana) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण केळीवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं शेकडो हेक्टरील केळी पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शेतकरी आपलं केळीचं पीक उपटून फेकण्यास सुरुवात केली आहे. सीएमव्ही व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं केळीसाठी जगात अग्रेसर असलेला जळगाव जिल्हा आता केळी पिकासाठी धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे.




शाससाननं वेळीच उपाययोजन कराव्यात, अन्यथा... 


जळगाव जिल्ह्यात सध्या शेकडो हेक्टर केळीवर सीएम्व्ही व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेकडो हेक्टरील केळी पीक वाया जाण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली केळी पीक उपटून टाकण्यास देखील सुरुवात केली आहे. केळीसाठी जगात अग्रेसर असलेला जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर आता मोठं संकट आल आहे. दरम्यान, शासन पातळीवर या व्हायरसवर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर जळगावं केळी वैभव पुढे कायम राहील का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 


जळगाव जिल्ह्यातील जवळपास आठ हजार हेक्टरवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव


जळगाव  जिल्ह्यात पाच ते आठ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकावर  एम् व्ही व्हायरसचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव झाला आहे. यातील दोन ते तीन हजार हेक्टर क्षेत्रातील केळी पीक शेतकऱ्यांनी उपटून फेकली आहे. यातून दोन ते तीन हजार कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. त्यामुळं जळगावच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे. हा रोग दिवसागनिक वाढत असल्यानं हे नुकसान अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 




परतीच्या पावसाचा शेती पिकांना फटका


राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस पडत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीनसह कापूस, भाजीपाला, तसेच टोमॅटो द्राक्ष बागांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे. सध्या खरीपातील पिकांची काढणी सुरु आहे. अशातच राज्यात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरु आहे. अशातच आज पुन्हा राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Rain News : सांगलीसह नांदेड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका, टोमॅटोसह सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात