एक्स्प्लोर

मंत्री गिरीश महाजन रोहित पवारांच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यांना केला फोन, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?

आज मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळावरुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता.

Rohit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्ती न लावता कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला विविध संघटनांकडून, राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, आज मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळावरुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता. हे आंदोलन पवित्र भूमित होत आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही असे रोहित पवार म्हणाले. त्यामुळं या योजनेतील अन्यायकारक अटी काढाव्यात आणि सरसकट कर्जमाफी कराव्यात अशी मागणी रोहित पवार यांनी केली. सरकार याबाबत सकारात्मक असल्याची माहिती महाजन यांनी दिल्याचे रोहित पवार म्हणाले. 

 रेग्युलर शेतकऱ्यांना 50 हजारांचे लिमिट आहे ते वाढवाले पाहिजे 

गिरीश महाजन यांचे अभिनंदन केले. कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले आहे. मी ज्या मतदारसंघात काम करतो तिथेच अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला आहे. सरकारनं काढलेला जीआर महत्वाचा आहे. सरकारचे अभिनंदन करतो. फक्त या जीआरमध्ये अनेक अटी आहेत. यामुळं अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. 2019 ची कर्जमाफी झाली. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला त्यांना आताच्या या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही. ही अटक काढा असे रोहित पवार म्हणाले. सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी आहे. रविकांत तुपकर बुलढाण्यात ते आंदोलन करत आहेत. त्यांना देखील भेटा असे रोहित पवार म्हणाले. रेग्युलर शेतकऱ्यांना 50 हजारांचे लिमिट आहे ते वाढवाले पाहिजे असे रोहित पवार म्हणाले. 

जास्त वेळ आपण न बसता उपोषण सोडावं

आपण मुंबईला यावं, तिथे आपण चर्चा करु. 22 तारखेच्या आत बैठक घेऊ यावर सकारात्मक तोडगा काढू असे मुख्यमंत्री मला म्हणाल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. 22 च्या आधी आपण मुंबईत बसून चर्चा करु असे महाजन म्हणाले. उपोषणाला बसून मार्ग निघणार नाही. जास्त वेळ आपण न बसता उपोषण सोडावं असं महाजन म्हणाले.  कर्जमाफी झाल्यावर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यासंदर्भात पत्र देणं गरजेचं होते. असे केले असते तर उपोषणाची वेळ आली नसती. काहीतरी मार्ग निघाला असता असे महाजन म्हणाले. जवळपास 37 हजार कोटी रुपयांपर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे. चर्चा कल्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो. यासाठी चर्चा करावी लागेल असे महाजन म्हणाले. सरकार शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आहे. शेतकऱ्यांचे ज्यावेळी नुकसान झाले त्यावेळी सरकारनं चांगली मदत केली असल्याचे महाजन म्हणाले. कर्जमाफीमध्ये सुधारणा झाली पाहिजे, असे वाटत असेल तर आपण चर्चा करु. 22 तारखेच्या आत यामध्ये बैठक घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे महाजन म्हणाले. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे महाजन म्हणाले. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
Vidarbha Cow Scam: पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Embed widget