Fire News in Nagpur : नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Kalmana Agricultural Produce Market Committee Nagpur) परिसरात भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्री दोन वाजन्याच्या सुमारास घडली. या आगीमध्ये एका शेडमध्ये ठेवलेली कोट्यवधी रुपयांची लाल मिरची (Red chili) जळून खाक झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. दरम्यान, काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र या आगीच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये बाजार समिती प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे.


मोठा आर्थिक फटका


मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही लागली होती. आग भीषण असल्यामुळं काही वेळातच एका शेडमध्ये ठेवलेली कोट्यवधी रुपयांची लाल मिरची जळून खाक झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसला आहे.  दरम्यान, घटनेची माहती मिळताच तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. मात्र, नागपूर कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही नागपूरच्या वेशीवर आहे. तिथपर्यंत अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत आग चांगलीच भडकली होती. यामध्ये व्यापाऱ्यांनी ठेवलेली लाल मिरची जळून खाक झाली. सध्या अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र, व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 




शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई द्यावी, संचालक मंडळातील सदस्यांची मागणी


नागपूरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांची मिरची जळून खाक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. बाजार समितीच्या संचालकांनी दिलेल्या माहितीप्रमाणं कालच (23 नोव्हेंबर) आग लागलेल्या शेडमध्ये इलेक्ट्रिसिटीचे काम झाले होते. ते काम अर्धवट असल्यामुळं रात्री दोन वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळं आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आगीत जळून खाक झालेली मिरची शेतकऱ्यांची होती. त्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संचालक मंडळातील सदस्यांनी केली आहे. आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, चार ते पाच हजार पोती लाल मिरची जळून खाक झाल्याची माहती संचालक मंडळाच्या सदस्यांनी दिली आहे. नुकसानीचा प्राथमिक अंदाज अद्याप व्यापाऱ्यांकडून मिळालेला नाही. जवळपास 15 ते 17 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहितीही सदस्यांनी दिली आहे. मात्र, यामध्ये 40 हून अधिक व्यापाऱ्यांचा मिरचीचा साठा जळाल्याची माहिती अग्निशमाक दलाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: 


Pakistan's Red Chilli : अशियातील मिरची राजधानीला पुराचा मोठा फटका, पाकिस्तानात दर वाढण्याची शक्यता